शरद पवारांच्या घरावर दगडफेक, सुप्रिया सुळे घुसल्या अंदोलकांच्या घोळक्यात, चर्चेची तयारी दाखवली पण

मुंबई  : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी दगडफेक तसेच चप्पलफेक करत निदर्शने केली. या अंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गृहविभागाचेही वाभाडे चव्हाट्यावर आले आहेत.जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न या घटनेतून निर्माण झाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आज दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरासमोर आक्रमक होत अंदोलन केले. या भागात सध्या तणावाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आता आक्रमक झाले आहेत. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी बळाचा वापर करत एस टी कर्मचारी अंदोलकांना ताब्यात घेतले आहे.  या घटनेचा राजकीय सामाजिक वर्तुळातून निषेध नोंदवला जात आहे.

दरम्यान अंदोलन सुरू असताना खासदार सुप्रिया सुळे संतप्त कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या आणि माझी सर्व कर्मचाऱ्यांशी बोलण्याची तयारी आहे. मात्र, शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवण्याचा पर्याय त्यांनी संतप्त कर्मचाऱ्यांसमोर ठेवला परंतू कर्मचारी घोषणाबाजी करण्यात व्यस्त होते. (Supriya Sule in ST Strike)

माझी आई आणि मुलगी घरात आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करू दे. त्यानंतर मी पुन्हा तुमच्याशी शांततेच्या मार्गाने संवाद साधायला तयार आहे,अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली. तरीही एस टी कर्मचारी आक्रमक असल्याचे दिसत होते, काही अंदोलक अत्यंत असभ्य आणि शिवराळ भाषेत पवार कुटुंबाविरोधात घोषणाबाजी करत होते.

एसटीच्या निलीनीकरणावर अद्याप कर्मचारी ठाम आहेत. कोर्टाचा निर्णय अन्यायकारी असल्याचं त्यांनी म्हटलं. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलीनीकर न होण्यामागचे सूत्रधार असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडी सरकारने १२४ एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त भूमिका आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली.

शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर अंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी जय श्रीरामच्या जोरदार घोषणा दिल्या, या अंदोलनामागे हिंदूत्ववादी संघटना किंवा पक्ष आहेत का ? याचा तातडीने सरकारने शोध घ्यावा अशी मागणी आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत. (ST workers attack on sharad pawars’ house)