बिग ब्रेकिंग : शरद पवारांच्या निवासस्थानासमोर एसटी कर्मचाऱ्यांचे अंदोलन

मुंबई: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून एस टी कर्मचारी अंदोलन करत आहेत. कोर्टाने नुकतेच कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर अंदोलन स्थगित होईल असे चित्र असतानाचा आक्रमक झालेल्या एस टी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर आज दुपारी साडे तीन वाजता अंदोलन सुरू केले आहे.

कोर्टाच्या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी कालच जल्लोष केला होता मात्र, आज अचानक जेष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानासमोर एस टी कर्मचाऱ्यांनी अंदोलन सुरू केले आहे.

जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. अचानक झालेल्या या अंदोलनामुळे पोलिसांची धावपळ उडाली आहे. सध्या  एस टी कर्मचारी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. शरद पवार मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. तसेच अजित पवार हाय हाय अश्या घोषणा दिल्या जात आहेत.

पुढील अपडेट लवकरच….