- Advertisement -

Skymet Monsoon forecast 2022 | यंदा महाराष्ट्रात पाऊस किती ? जाणून घ्या स्कायमेटने वर्तवलेला अंदाज

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Skymet Monsoon forecast 2022 । अवंदा उष्णतेच्या लाटेने राज्यात कहर केला आहे. त्यामुळे त्याचा मान्सूनवर (पावसाळ्यावर) काही परिणाम होणार का ? तसेच यंदाचा पावसाळा कसा असेल ? याविषयी चर्चा रंगलेली असतानाच स्कायमेट (Skymet) या हवामान विषय संस्थेने शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक मोठी बातमी दिली आहे.

हवामानाबाबत माहिती देणार्‍या स्कायमेट या खाजगी संस्थेने केलेल्या अगामी मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. देशात 98% मान्सूनची शक्यता स्कायवॉकचे वर्तवली आहे. त्यामुळे देशात आगामी काही महिन्यात चांगला मान्सून (Monsoon) बरसणार असल्याचं चित्र आहे.

जुन ते सप्टेंबरपर्यंत देशात पडणार्‍या पावसात 5% पेक्षा कमी जास्त एरर मार्जिनचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.स्कायमेट प्रमाणेच भारतीय हवामान विभाग देखील आपला अंदाज व्यक्त करत असतो. एप्रिल महिन्याच्या अखेरीला आयएमडी आपला अंदाज व्यक्त करण्याची शक्यता आहे.

स्कायमेटच्या अंदाजाप्रमाणे राजस्थान, गुजरात सोबत नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तर जुलै- ऑगस्ट महिन्यात केरळ आणि कर्नाटकात थोडा कमी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पंजाब, हरियाणा, युपी आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सरासारीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. यंदा जून महिन्यातच दमदार एंट्रीने पाऊस गाजणार आहे. पूर्वार्धामध्ये उत्तरार्धापेक्षा अधिक चांगला पाऊस होणार आहे.

मान्सून काळातील हवामानाचा अंदाज लक्षात घेता महाराष्ट्रात मागील वर्षीप्रमाणे दमदार पाऊस होणार असल्याचे संकेत मिळत आहेत, त्यामुळे यंदा बळीराजाला सजग रहावे लागणार आहे.