जवळा सोसायटी निवडणूक : प्रशांत शिंदेंची मोठी घोषणा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । जवळा विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुकीत शेतकरी ग्रामविकास पॅनलने प्रचाराचा नारळ फोडत विरोधकांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. तापलेल्या उन्ह्यात जवळ्याचे राजकीय मैदान आता अधिकच तापले आहे. जवळा सोसायटी निवडणूकीच्या प्रचारसभेत प्रशांत शिंदे यांनी काही मोठ्या घोषणा केल्या. 

शेतकरी ग्रामविकास पॅनलचे नेते प्रशांत शिंदे यांनी प्रचारसभेत बोलताना विरोधकांवर जहरी टीका न करता जनतेने शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या हाती सत्ता का द्यावी याविषयी त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. तसेच पाच मोठ्या घोषणा केल्या.

दरम्यान शेतकरी ग्रामविकास आघाडीने आज सकाळी प्रचाराचा नारळ फोडत प्रचार प्रारंभ केला. जवळा फाटा ते जवळेश्वर मंदिर अशी भव्य रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर जवळेश्वर मंदिरासमोर प्रचारसभा पार पडली.

या सभेत शेतकरी ग्रामविकासचे नेते प्रशांत शिंदे यांच्यासह माजी सभापती सुभाष अव्हाड, विष्णू हजारे, सावता हजारे, रफिक शेख, आप्पासाहेब मते, बाजीराव पठाडे, शिवानंद कथले, राम वाळुंजकर सह आदींची भाषणे झाली.

प्रशांत शिंदेंनी केल्या खालील घोषणा

  1. कमीत कमी वीस गुंठे क्षेत्र असलेल्या प्रत्येक शेतकऱ्यास सभासद करणार
  2. प्रत्येक सभासदास दुभती जनावरे घेण्यासाठी कर्ज वाटप करणार
  3. संस्थेच्या नफ्यातील डिव्हिडंड वाटप करणार
  4. मार्च एण्ड नंतर दहा दिवसांत कर्ज वाटप करणार
  5. नाबार्डकडून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबवणार

अपक्षांचा पाठिंबा

जवळा सोसायटी निवडणूकीत 5 अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत यातील किसन गोयकर,भाऊसाहेब सुळ, शिवानंद कथले या तीन अपक्ष उमेदवारांनी शेतकरी ग्रामविकास आघाडीला जाहिर पाठिंबा दिला. तसेच अनंता लेकुरवाळे यांनीही पाठिंबा दिला. यामुळे शेतकरी ग्रामविकास आघाडीचे बळ वाढले आहे.

तसेच शेतकरी ग्रामविकास आघाडीची रॅली सुरू असताना रफीकभाई शेख, जाफर शेख, जुबेर शेख, मुक्तार शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांचा ग्रामपंचायत कार्यालयासमोर सत्कार करत पाठिंबा दर्शविला.

शेतकरी ग्रामविकास आघाडीचे नेते प्रशांत शिंदे यांचे संपुर्ण भाषण