जवळ्याचे सुपुत्र राजेंद्र पवार यांची सहायक आयुक्तपदी पदोन्नती !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड तालुक्यातील जवळा गावचे सुपुत्र राजेंद्र पवार यांची अन्न व औषध प्रशासनात सहाय्यक आयुक्त Assistant Commissioner (Food)  या पदावर नुकतीच पदोन्नती झाली आहे. (Promotion of Rajendra Pawar as Assistant Commissioner, Food and Drug Administration)

राजेंद्र पवार हे गेल्या 30 वर्षापासुन अन्न व औषध प्रशासनात अन्न निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सेवा बजावली आहे. नुकतीच त्यांची अन्न निरीक्षक या पदावरून पदोन्नती झाली असून आता ते सहाय्यक आयुक्त म्हणून या विभागात कार्यरत असणार आहेत. मुंबई विभागात ते सेवा बजावत आहेत.

“शांत, संयमी आणि कामाशी प्रामाणिक अशी ओळख असलेले अधिकारी म्हणून त्यांना संपुर्ण विभागात ओळखले जाते, त्यांच्याकडे आलेल्या नव्या जबाबदारीच्या माध्यमांतून ते अधिक दमदार कामगिरी करतील असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जात आहे.”

दरम्यान राजेंद्र पवार यांची अन्न व औषध विभागात सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल आमदार रोहित पवार, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांनी सत्कार केला तसेच जवळा ग्रामस्थांनीही पवार यांच्या निवडीचा मोठा आनंदोत्सव साजरा करत पवार यांचा नागरी सत्कार केला.

“आरडी ग्रुपच्या माध्यमांतून राजेंद्र पवार हे जवळा गावच्या राजकारणात सक्रीय आहेत, त्यांच्या गटाची मोठी ताकद आहे. तसेच राजेंद्र पवार यांच्या पत्नी स्मिता पवार ह्या आदिनाथ साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक आहेत. जवळा गावच्या राजकारणात RD ग्रुपची ताकद नेहमी निर्णायक ठरत आलेली आहे.”

दरम्यान राजेंद्र पवार यांची सहाय्यक आयुक्तपदावर पदोन्नती होताच त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.