धक्कादायक : जामखेडमध्ये सापडल्या तब्बल ‘इतक्या’ चोरीच्या बुलेट (Shocking: So many ‘stolen’ bullets found in Jamkhed)
जामखेड टाईम्स वृत्तसेवा: पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण, नवीमुंबई, ठाणे या भागातून संघटीतपणे बुलेट गाड्या चोरणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या युनिट 3 ला मोठे यश आले. तब्बल 14 बुलेट व दोन मोटारसायकली जामखेडमधून हस्तगत करण्याची धडाकेबाज कारवाई युनिट 3 च्या पथकाने पार पाडली आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे. (Shocking:So many ‘stolen’ bullets found in Jamkhed)
या कारवाईमुळे बुलेट वापरणारांचेही आता भलतेच धाबे दणाणले आहेत. जामखेड तालुक्यातील बुलेटधारक आता पोलिसांच्या रडारवर आले असुन संशयितांची कोणत्याही क्षणी चौकशी होऊन कारवाई होऊ शकते अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.