Palak Mantri Maharashtra 2025 List : मोठी बातमी ! अखेर जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची घोषणा, मुंबई शहर, ठाणे, पुणे, बीड, नाशिक, रायगड, अहिल्यानगर, नागपुर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी कोणाची वर्णी ? वाचा संपूर्ण यादी

Palak Mantri Maharashtra 2025 list :  राज्यातील पालकमंत्रीपदाची घोषणा कधी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. अखेर राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्री (Palak mantri 2025) व सह पालकमंत्री या पदांची घोषणा महायुती सरकारने केली आहे.याबाबत सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत.ठाणे व मुंबई शहर पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार हे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत.राधाकृष्ण विखे-पाटील हे अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याचे पालकमंत्री असणार आहेत.(Palak mantri of maharashtra 2025)

Palak Mantri Maharashtra 2025 List,  Big News, Finally,  announcement of district wise guardian ministers in maharashtra, who will be  palak mantri of Mumbai city, Thane, Pune, Beed, Nashik, Raigad, Ahilyanagar, Nagpur district? Read the full list

सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील मंत्री व राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्री व सह पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्याबाबत १८ जानेवारी रोजी शासन निर्णय जारी केला आहे. यामध्ये ३७ पालकमंत्री व 3 सह पालकमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांत मोठी रस्सीखेच सुरू होती. काही जिल्ह्यांवर तिन्ही पक्षांनी दावा केला होता.पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये अनेक मॅरेथॉन बैठका पार पडल्या. त्यानंतर या विषयावर एकमत झाले आणि त्यानंतर यापदांच्या निवडी सरकारने आज जाहीर केल्या.

Palak Mantri Maharashtra 2025 List : राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्री व सह-पालकमंत्री यादी खालीलप्रमाणे

गडचिरोली पालकमंत्री – देवेंद्र फडणवीस
नागपूर पालकमंत्री – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे पालकमंत्री – एकनाथ शिंदे
पुणे पालकमंत्री – अजित पवार
बीड पालकमंत्री – अजित पवार

अमरावती पालकमंत्री – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर पालकमंत्री – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम पालकमंत्री – हसन मुश्रीफ
सांगली पालकमंत्री – चंद्रकांत पाटील
सातारा पालकमंत्री -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर पालकमंत्री – संजय शिरसाट
जळगाव पालकमंत्री – गुलाबराव पाटील

यवतमाळ पालकमंत्री – संजय राठोड
कोल्हापूर पालकमंत्री – प्रकाश आबिटकर,
अकोला पालकमंत्री – आकाश फुंडकर
भंडारा पालकमंत्री – संजय सावकारे
बुलढाणा पालकमंत्री – मंकरंद जाधव
चंद्रपूर पालकमंत्रि – अशोक ऊईके
धाराशीव पालकमंत्री – प्रताप सरनाईक

धुळे पालकमंत्री – जयकुमार रावल
गोंदिया पालकमंत्री – बाबासाहेब पाटील
हिंगोली पालकमंत्री – नरहरी झिरवळ
लातूर पालकमंत्री – शिवेंद्रसिंग भोसले
मुंबई शहर पालकमंत्री – एकनाथ शिंदे
नांदेड पालकमंत्री – अतुल सावे

नंदुरबार पालकमंत्री – मानिकराव कोकाटे
नाशिक पालकमंत्री – गिरीश महाजन
पालघर पालकमंत्री – गणेश नाईक
परभणी पालकमंत्री – मेघना बोर्डीकर

रायगड पालकमंत्री – अदिती तटकरे
रत्नागिरी पालकमंत्री – उदय सामंत
सिंधुदुर्ग पालकमंत्री – नितेश राणे
सोलापूर पालकमंत्री- जयकुमार गोरे
वर्धा पालकमंत्री – पंकज भोयर
जालना पालकमंत्री – पंकजा मुंडे

सहपालकमंत्री 2025

गडचिरोली सह पालकमंत्री –  आशिष जयस्वाल
मुंबई उपनगर सह पालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
कोल्हापूर  सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ

धनंजय मुंडेंना जोरदार धक्का

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वादात सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे. पालकमंत्री पदाच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आला नाही. त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.