धक्कादायक : साईनगरी शिर्डीत भरदुपारी गोळीबार !गोळीबाराच्या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात उडाली मोठी खळबळ !

Shirdi Golibar latest news today : गोळीबाराची एक मोठी घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असलेल्या साईनगरी अर्थात शिर्डी (Shirdi Firing today news) शहर गोळीबाराच्या घटनेने हादरून गेली आहे. भरदुपारी झालेल्या या घटनेमुळे शिर्डीत मोठी खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. (Shirdi golibar news)

Shocking, breaking news, Firing incident sparks excitement in Ahmednagar district, firing in Sainagari Shirdi, shirdi golibar latest news today,

साम टीव्हीच्या वृत्तानुसार, गुरूवारी दुपारी शिर्डी शहरातील एका खाजगी पार्किंगमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत अज्ञाताने दोन गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान या घटनेत एका हाॅटेलमधील खोली गोळी घुसल्याचेही समोर आले आहे. या घटनेनंतर संशयिताने घटनास्थळाहून धूम ठोकली. गोळीबाराच्या घटनेने शिर्डीत मोठी खळबळ उडवून दिली आहे.

या घटनेची माहिती समजताच शिर्डी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. या घटनेचा तपास सुरू आहे. नेमका गोळीबार कुणी आणि का केला याबाबत तपास सूरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (सविस्तर वृत्त लवकरच)