Shah Rukh Khan viral photo | लतादीदींच्या अंत्यसंस्कारात घडले गंगा जमूनी तहजीबचे अनोखे दर्शन, शाहरूख खानचा फोटो सोशल मिडीयावर होतोय वायरल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । shahrukh Khan viral Photo |  गान कोकीळा लता मंगेशकर यांनी रविवारी मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या अंत्यसंस्कारात गंगा – जमूनी परंपरेचे अनोखे दर्शन झाले. बॉलीवूड किंग शाहरूख खानचा एक फोटो सोशल मिडीयावर जोरदार वायरल झाला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानही (Shah Rukh Khan) लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारापूर्वी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) पोहोचला. लतादीदींच्या पार्थिवावर पुष्प अर्पण केल्यानंतर शाहरुखने हात वर करून आपल्या पारंपरिक शैलीत दुआ वाचली, त्यानंतर लतादीदींच्या पायाला स्पर्श करून लतादीदींना अंतिम निरोप दिला.

शाहरुखचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लतादीदींच्या पार्थिवाच्या जवळ उभा राहून दुआ करताना दिसत आहे. इंटरनेटवर त्याचे छायाचित्र पाहिल्यानंतर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. येथे शाहरुख खान त्याच्या मॅनेजरसोबत दिसला.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी शाहरुखसोबत उभ्या असलेल्या महिलेला त्याची पत्नी गौरी खान समजले. शाहरुखच्या या फोटोला काही लोकांनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला तर अनेकांनी याला खरा हिंदुस्थान म्हटले.

शाहरुख खान हे भारतीय संस्कृतीचे जिवंत उदाहरण असल्याचे लोक म्हणाले. ड्रग्ज प्रकरणी मुलगा आर्यन खानला अटक करून सोडल्यानंतर शाहरुख खान मीडियाच्या लाइमलाइटपासून दूर होता. मात्र, लतादीदींच्या निधनाची बातमी कळताच ते स्वत:ला रोखू शकले नाहीत आणि त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले.

लतादींदींचे अंतिम दर्शन घेताना शाहरुख खान ने दुआ केली, हा फोटो सोशल मिडीयावर वायरल झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया यावर येत आहेत.हा नुसता फोटो नसुन खरा हिंदुस्थान आहे. अश्या कमेंट अनेकांनी दिल्या आहेत.

स्वानंद किरकिरे यांनी शाहरुखचा फोटो ट्विट करत अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान अश्या ओळी लिहीत फोटो पोस्ट केला आहे.

मानसी उभे या ट्विटर युजर ने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कुछ जाते है मंदिरो में, कुछ मस्जिदों की राह अपनाते है, पर मक़सद तो सबका एक ही, जिसे लोग ख़ुशी की फ़रियाद कहते है अशी पोस्ट केली आहे.

मयुर या ट्विटर युजरने म्हटले आहे की, हा भारत आहे, राज्यांचा संघ, सुंदर फुलांचा पुष्पगुच्छ, लतादीदींना भावपूर्ण आदरांजली.

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी फोटो ट्विट करत म्हटले आहे की, धिस इज आयडिया ऑफ इंडिया, हजारो युजर्सने शाहरुख खानच्या फोटोवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडत शाहरूखचे कौतुक केले आहे.