Ahmednagar ZP Election 2022 । वाढीव जिल्हा परिषद गटात जामखेड तालुक्याला ठेंगा ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्यात अगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद गटांची संख्या वाढणार आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्हा परिषदेत एकुण 85 जिल्हा परिषद गट अस्तित्वात येणार आहेत. (Ahmednagar ZP Election 2022)

वाढीव जिल्हा परिषद गटांमध्ये जामखेड तालुक्याच्या वाट्याला मात्र ठेंगा मिळाल्यात जमा आहे अशी विश्वसनीय माहिती समोर येत आहे. परंतू निवडणूक आयोगाकडून यासंबंधी अधिकृत माहिती जारी झाल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

जामखेड नगरपरिषदेच्या निर्मिती आधी जामखेड तालुक्यात तीन जिल्हा परिषद गट अस्तित्वात होते. तेव्हा अवघ्या १२६ मतदार कमी असल्यामुळे दोन जिल्हा परिषद गट अस्तित्वात आले होते. परंतू आता मतदारसंख्या वाढली आहे.

सन २०१७ सालानंतर तालुक्यात मतदारसंख्या वाढली आहे. त्यामुळे तिसरा जिल्हा परिषद गट अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला. निवडणूक आयोगाकडून तिसऱ्या गटाच्या निर्मितीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.

दरम्यान सरकारने राज्यात वाढीव जिल्हा परिषद गटांच्या निर्मितीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात एकुण 85 जिल्हा परिषद गट अस्तित्वात येणार आहेत. या वाढीव गटात जामखेड तालुक्याच्या वाट्याला आणखी एक गट येणार अशी चर्चा रंगली होती. (Ahmednagar ZP Election 2022)

स्वता: आमदार रोहित पवार यासाठी प्रयत्नशील होते. परंतू विश्वसनीय सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार वाढीव चौथा गट जामखेड तालुक्याला मिळणार नाही. काही तांत्रिक अडचणीमुळे चौथा जिल्हा परिषद गट निर्मितीस अडसर आला आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाकडून जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद गटांसंदर्भात अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज तारीख असून यात जामखेड तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांवर शिक्कामोर्तब होऊन येत्या आठवडाभरात तीन जिल्हा परिषद गट कोणते ? त्यात कुठल्या गावांचा समावेश ? याबाबतची माहिती सार्वजनिक केली जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. (Ahmednagar ZP Election 2022)