Lata Mangeshkar passes away | जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे निधन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून आजाराशी झुंज देत असलेल्या जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (Senior singer Lata Mangeshkar passes away)

लता मंगेशकर ह्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या, मध्यंतरी त्यांची तब्येत सुधारली होती. परंतू शनिवारी त्यांची तब्येत पुन्हा खालावली होती. त्यांना पुन्हा व्हेंटीलेटरवर उपचार केले जात होते. परंतू त्यांची झुंज आज अपयशी ठरली. अखेर लतादीदींनी आज जगाचा निरोप घेतला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत लतादीदींच्या निधनाचे वृत्त दिले आहे. युग संपले अश्या दोन शब्दांचे ट्विट राऊत यांनी केले आहे.

राऊत यांनी आणखी काही ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, एक सुर्य, एक चंद्र, एक लता.. तेरे बिना भी क्या जिना असे म्हणत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

लतादीदी यांच्या जाण्याने जगभरातील त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

बातमी अपडेट होत आहे….