Road Robbery | पोलिस असल्याचे भासवून आडवली एसटी अन् मारला सव्वा कोटीच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला !

पुणे जिल्ह्यातील पाटस येथील घटना

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  राज्यात चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. चोरटे चोरी करण्यासाठी नवनवीन आयडियाच्या कल्पना लढवत हात साफ करत असल्याचे समोर येत आहे.  पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस येथून (Road Robbery) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

चोरट्यांनी चक्क पोलिस असल्याचे भासवून एस टी बस लुटल्याच समोर आले आहे. (Road Robbery) या घटनेत तब्बल सव्वा कोटी रूपयांची रक्कम चोरीस गेली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली . या घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलिस चक्रावून गेले आहेत.

याबाबत पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिलेली माहिती अशी की, निलंगा – भिवंडी ही बस पाटसमार्गे पुण्याच्या दिशेने मंगळवारी मध्यरात्री निघाली होती. या बसमध्ये कुरियर सर्व्हिस करणारे हितेंद्र जाधव ( वाघोशी, ता. फलटण ) विकास बोबडे, तेजस बोबडे, संतोष बोबडे (तिघे रा. फलटण , जि. सातारा ) हे चौघे प्रवास करत होते. त्यांच्याकडे १ कोटी १० लाख रुपये रोख रक्कम आणि मेटल होते.(Road Robbery)

एसटी बस पाटस येथील ढमालेवस्ती परिसरात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आली असता या एसटीला चौघांनी अडवलं. त्यांच्या हातात काठ्या, खाकी पँट परिधान केलेले आणि पायात बुट असा पेहराव असल्याने बस चालकाला पोलीस असल्याचे निदर्शनास आले.(Road Robbery)

बस चालकाने बस थांबवली असता कंडक्टरने दरवाजा ऊघडताच या चौघांनी काठ्या आपटत पोलीसी तोऱ्यात गाडीत चढत शिवीगाळ सुरू केली व गाडीत कुरियरवाले कोण आहे असे म्हणाले. तेव्हा बसमध्ये पाठीमागे बसलेले चौघे उठले.तेव्हा त्यांच्या शर्टच्या कॉलर पकडत त्यांना एसटीमधून बाहेर काढले आणि एसटी चालकाला जायला सांगितले. एसटी गेल्यावर या चौघांना मारहाण करत त्यांच्याकडील रक्कम आणि मेटल हिसकावून घेतले आणि दोन दुचाकी वाहनावावरुन चोरटे पळून गेले.(Road Robbery)

दरम्यान निलंगा – भिवंडी बसमधून कुरियरवाले प्रवास करत आहेत त्यांच्याकडे कोट्यावधी रूपयांची रक्कम आहे ही माहिती चोरट्यांना कशी समजली ? चोरट्यांनी थेट गाडी अडवत गाडीत कुरियरवाले कोण आहेत ? असा थेट उल्लेख कसा काय केला ? या चोरीच्या प्रकरणात कुरियन कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा तर हात नसेल ना ? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पोलिस त्यादृष्टीने कसुन तपास करत आहेत. या प्रकरणात धक्कादायक माहिती हाती लागण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी दिली आहे. यामुळे या प्रकरणात काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Road Robbery)