Pankaja Mundhe Dasara Melava LIVE 2022 : पंकजा मुंडेंची गर्जना; शिवरायांचा पराक्रम, भगवान बाबांची सात्त्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख

जामखेड टाइम्स वृत्तसेवा  : Pankaja Mundhe Dasara Melava LIVE 2022 | हकीगत को तलाश करना पडता है, अफवाए तो घर बैठे बैठे मिल जाती है असे म्हणत शिवरायांचा पराक्रम, भगवान बाबांची सात्त्विकता आणि मुंडे साहेबांचा संघर्ष हीच माझी ओळख आहे अशी गर्जना भाजपा नेत्या पंकजाताई मुंडे यांनी सावरगावच्या दसरा मेळाव्यात बोलताना केली.

Pankaja Mundhe Dasara Melava LIVE 2022

माना के औरो के मुकाबले कुछ पाया नही हमने, पर खुद को गिराकर कुछ उठाया नही हमने म्हणत पक्षाने तिकीट दिले तर 2024 साठी परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी करणार आहे असे पंकजाताई यांनी स्पष्ट केले.

Pankaja Mundhe Dasara Melava LIVE 2022

जरुरत से ज्यादा इमानदार हू मै इसलिये सबके नजरों में गुनहगार हू मै असे सांगत पंकजाताई म्हणाल्या की, मला पक्षाला त्रास द्यायचा नाही, मला कुठल्या नेत्याबद्दल काही बोलायचं नाही, आता आपण आपलं शांत रहायचं, 2024 च्या तयारीला लागा, आपण दाखवून देऊ समर्पणाची ताकद असे अवाहन यावेळी पंकजा मुंडे यांनी केले.

Pankaja Mundhe Dasara Melava LIVE 2022

माझ्याकडे तुमच्यासाठी द्यायला खुर्च्या नाहीत. मला तुमची काहीच व्यवस्था करता आलेली नाही. ती माझी ऐपत नाही. तुम्ही मला सांभाळून घेताय, ही मोठी गोष्ट आहे.

संघर्षाशिवाय नाव होत नाही. भगवानबाबांनाही खूप मोठा संघर्ष करावा लागला. त्यांना खूप परीक्षा द्याव्या लागल्या. भगवानगड स्थापन कारावा लागला. श्रीकृष्णालाही संघर्ष करुन द्वारका स्थापन करावी लागली.स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांनाही संघर्ष कारावा लागला. ४० वर्षे त्यांनी संघर्ष केला. तेच रक्त माझ्यात असल्यामुळे मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही.

Pankaja Mundhe Dasara Melava LIVE 2022

गर्दी हीच माझी शक्ती आहे. हेच जे.पी. नड्डांनी मला सांगितलं. मी फक्त गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत नाही. तर मी पंडित दिनदयाळ उपाध्याय, अटलजींचा, प्रमोदजींचा नरेंद्र मोदी, अमित शाहांचा वारसा चालवते. मी शत्रुविषयी वाईट बोलत नाही तर माझ्याविषयी वाईट बोलणारांवर टीका कशी करेल”