Palak Mantri List 2025 Maharashtra : पालकमंत्री निवडीनंतर पुन्हा नवा ट्विस्ट ! नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती, कारण काय ? जाणून घ्या
Palak Mantri List 2025 Maharashtra : सरकारने राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची शनिवारी घोषणा केली. यामध्ये ३७ पालकमंत्री व ३ सह पालकमंत्री यांची यादी जाहीर (palak mantri list) करण्यात आली. यामध्ये काही नेत्यांची पालकमंत्रीपदी वर्णी न लागल्याने महायुतीत नाराजी नाट्य रंगल्याचेही पहायला मिळतेय. शिवसेना व राष्ट्रवादीतून नाराजी समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटल्यामुळे पालकमंत्री निवडीनंतर (palak mantri list 2025) नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. सरकारने राज्यातील दोन जिल्ह्यांच्या Raigad Nashik palak mantri 2025) पालकमंत्रीपदाच्या निवडीला तडकाफडकी स्थगिती दिली आहे. (palak mantri of maharashtra)

राज्यात महायुतीने प्रचंड बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून बराच घोळ रंगला होता.त्याचीच पुनरावृत्ती पालकमंत्री निवडीत झाली.पालकमंत्री निवडताना बराच काळ तिन्ही पक्षांत तिढा निर्माण झाला होता. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी अनेक बैठका घेत त्यावर तोडगा काढला आणि शनिवारी रात्री पालकमंत्री व सह पालकमंत्री यांच्या निवडी सामन्य प्रशासन विभागाने जाहीर केल्या.यामध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे व चंद्रशेखर बावनकुळे या तीन मंत्र्यांकडे प्रत्येकी दोन जिल्ह्यांचा कारभार देण्यात आलाय.
या निवडीनंतर शिवसेनेतून पहिला नाराजीचा सुर आला. त्याला कारण ठरले रायगड व नाशिकचे पालकमंत्री पद, रायगडच्या पालकमंत्रीपदी भरतशेठ गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्री दादा भुसे यांची वर्णी लागेल अशी शिवसेनेला अपेक्षा होती. परंतू झाले उलटेच. गोगावले व भूसे यांना डच्चू देत पालकमंत्रीपदाच्या नियुक्ती करण्यात आल्या.यामुळे शिवसेनेच्या गोटातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. रविवारी दिवसभर हाच विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होता. रायगड व नाशिकवरून नाराजीनाट्य रंगु लागताच सरकारने या दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.या निर्णयामुळे महायुतीसह राज्याच्या राजकीय वर्तुळात आता वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर मंत्री अदिती तटकरे तर नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती.मात्र, आता या नियुक्तीला सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीच्या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये म्हटलं, ‘महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री / सह-पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उक्त शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेल्या नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे.
सरकारने रायगड व नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती दिल्याने आता कोणाची या पदावर वर्णी लागणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
Palak mantri maharashtra 2025 list : महाराष्ट्र पालकमंत्री यादी 2025 खालीलप्रमाणे
- गडचिरोली पालकमंत्री – देवेंद्र फडणवीस
- नागपूर पालकमंत्री – चंद्रशेखर बावनकुळे
- ठाणे पालकमंत्री – एकनाथ शिंदे
- पुणे पालकमंत्री – अजित पवार
- बीड पालकमंत्री – अजित पवार
- अमरावती पालकमंत्री – चंद्रशेखर बावनकुळे
- अहिल्यानगर पालकमंत्री – राधाकृष्ण विखे पाटील
- वाशिम पालकमंत्री – हसन मुश्रीफ
- सांगली पालकमंत्री – चंद्रकांत पाटील
- सातारा पालकमंत्री -शंभुराजे देसाई
- छत्रपती संभाजी नगर पालकमंत्री – संजय शिरसाट
- जळगाव पालकमंत्री – गुलाबराव पाटील
- यवतमाळ पालकमंत्री – संजय राठोड
- कोल्हापूर पालकमंत्री – प्रकाश आबिटकर,
- अकोला पालकमंत्री – आकाश फुंडकर
- भंडारा पालकमंत्री – संजय सावकारे
- बुलढाणा पालकमंत्री – मंकरंद जाधव
- चंद्रपूर पालकमंत्रि – अशोक ऊईके
- धाराशीव पालकमंत्री – प्रताप सरनाईक
- धुळे पालकमंत्री – जयकुमार रावल
- गोंदिया पालकमंत्री – बाबासाहेब पाटील
- हिंगोली पालकमंत्री – नरहरी झिरवळ
- लातूर पालकमंत्री – शिवेंद्रसिंग भोसले
- मुंबई शहर पालकमंत्री – एकनाथ शिंदे
- नांदेड पालकमंत्री – अतुल सावे
- नंदुरबार पालकमंत्री – मानिकराव कोकाटे
- नाशिक पालकमंत्री – गिरीश महाजन
- पालघर पालकमंत्री – गणेश नाईक
- परभणी पालकमंत्री – मेघना बोर्डीकर
- रायगड पालकमंत्री – अदिती तटकरे
- रत्नागिरी पालकमंत्री – उदय सामंत
- सिंधुदुर्ग पालकमंत्री – नितेश राणे
- सोलापूर पालकमंत्री- जयकुमार गोरे
- वर्धा पालकमंत्री – पंकज भोयर
- जालना पालकमंत्री – पंकजा मुंडे
सह पालकमंत्री कोण?
- गडचिरोली सह पालकमंत्री – आशिष जयस्वाल
- मुंबई उपनगर सह पालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
- कोल्हापूर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ