Neeraj Chopra Himani Marriage : ऑलिंपिक विजेता निरज चोप्रा अडकला विवाह बंधनात, कोण आहे हिमानी मोर ? Who is Neeraj Chopra’s wife Himani Mor?

Neeraj Chopra Himani marriage : भारताचा स्टार भालाफेकपटू तथा दोन वेळचा ऑलिंपिक विजेता खेळाडू नीरज चोप्रा विवाह (neeraj chopra marriage) बंधनात अडकला आहे.अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या हिमानी मोर सोबत नीरजचा विवाह झालाय.(neeraj Himani marriage) एका खाजगी कार्यक्रमात जवळचे मित्र आणि कुटुंबियांच्या प्रमुख उपस्थितीत नीरज व हिमानी हे दोघे विवाहबद्ध झाले. (neeraj chopra wife) स्वता: नीरज चोप्राने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे दिली आहे. (Himani mor)

Neeraj Chopra Himani Marriage, breking news, Olympic winner Neeraj Chopra got married, who is Himani mor?, Neeraj Chopra wedding,  neeraj Chopra himani,

नीरज चोप्राने रविवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली असून त्या सोबत लग्नाचे काही छायाचित्रे (neeraj chopra marriage photo) जोडले आहेत. या पोस्टच्या माध्यमांतून नीरजने आपल्या विवाहाची माहिती उघड केली आहे.त्यात म्हटले आहे की, माझ्या कुटुंबासह आज मी जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू केला आहे. आम्हाला या क्षणी एकत्र आणणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल कृतज्ञ असे लिहीले आहे. (neeraj chopra wedding, neeraj Chopra himani mor )

तसंच त्याने लाल रंगाचा हार्ट इमोजी टाकून नीरज आणि हिमानी असे नाव टाकले आहे. नीरजने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याची पत्नी हिमानी दिसत आहे. तसेच दुसऱ्या एका फोटोमध्ये त्याची आई त्यांना आशीर्वाद देताना दिसतेय. त्याने शेअर केलेल्या तिसऱ्या फोटोत तो लग्नविधी पार पाडताना दिसतोय.

Who is Neeraj Chopra’s wife Himani Mor? : कोण आहे नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोर? तिचे शिक्षण किती ? ती काय करते ?

नीरज चोप्राच्या पत्नीचे नाव हिमानी मोर असून ती टेनिसपटू आहे. साऊथइर्स्टन लुईसियाना विद्यापीठ तिचे शिक्षण झाले आहे. फ्रॅंकलीन पिअर्स युनिव्हर्सिटीमध्ये तीने पार्ट-टाईम सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही काम केलं आहे. तसंच हिमानीकडे अमहेर्स्ट कॉलेजच्या महिला टेनिस टीमचीही जबाबदारी आहे. टीमचं ट्रेनिंग, वेळापत्रक, टीमची निवड, टीमचं बजेट तसंच खेळाडूंचे कपडे या सगळ्या गोष्टींची जबाबदारी हिमानीकडे आहे.

हिमानी मोर क्रीडा व्यवस्थापन आणि प्रशासन या विषयात मास्टर इन सायन्सचं पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हिमानी मॅककॉर्मॅक इसेनबर्ग स्कुल ऑफ मॅनेजमेंटमधून ही पदवी घेत आहे. हिमानी ही हरयाणाच्या लारसौलीची आहे, सोनीपतच्या लिटील एँगल स्कुलमधून तिने शिक्षण घेतलं आहे. हिमानीचा भाऊदेखील टेनिस खेळाडू आहे.

हिमानीने दिल्लीच्या मिरांडा हाऊस येथे राज्यशास्त्र आणि शारिरिक शिक्षण या विषयात पदवी घेतली, यानंतर हिमानी पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. ऑल इंडिया टेनिस असोसिएशनच्या वेबसाईटनुसार हिमानीचं टेनिसमधलं सर्वोत्तम रँकिंग 2018 साली 42 (सिंगलमध्ये) आणि 27 (डबलमध्ये) होतं. 2018 सालीच हिमानीने एआयटीए इव्हेंट्समध्ये खेळायला सुरूवात केली होती.

नीरज चोप्राचे ऑलिम्पिक करिअर

दरम्यान, नीरज चोप्रा हा भारताच्या सर्वोत्कृष्ट भालाफेकपटूंपैकी एक आहे. त्याने 2020 सालच्या टोक्यो येथील ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर 2024 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने रौप्य पदक पटकावले होते.