Palak Mantri List 2025 : पालकमंत्री निवडीत बड्या नेत्यांना तगडा झटका, तर नव्या मंत्र्यांना लाॅटरी ! गोगावले, मुंडे, भरणे, भुसे यांचा पत्ता कट तर मुश्रीफ यांची विदर्भात उचलबांगडी !
Palak Mantri List 2025 : प्रचंड बहुमताने महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले खरे पण आधी मंत्रीमंडळ आणि त्यानंतर पालकमंत्री (palak mantri 2025) निवडताना महायुतीत मोठी रस्सीखेच झाल्याचे दिसून आले. विशेषत: पालकमंत्रीपदाचा तिढा बराच दिवस चालला.परंतू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis cm) यांनी अतिशय काळजीपूर्वक हा विषय हाताळला आणि राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्री व सह-पालकमंत्र्यांची घोषणा शनिवारी रात्री केली. पालकमंत्री निवडीत (palak mantri yadi 2025) बड्या नेत्या तगडा झटका बसला आहे. काहींचा पत्ता कट झाला आहे. तर नव्या मंत्र्यांना पालकमंत्रीपदाची लाॅटरी लागली आहे. (palak mantri maharashtra 2025 full list)

सामान्य प्रशासन विभागाने शनिवारी रात्री राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्री व सह पालकमंत्र्यांच्या निवडीबाबत शासन निर्णय जारी केला. या यादीत राष्ट्रवादीचे वजनदार नेते व मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे तसेच शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले, प्रताप सरनाईक, भाजपचे मंत्री अतुल सावे, शिवेंद्रसिंह राजे भोसले, पंकजाताई मुंडे यांना तगडा झटका बसला आहे. यामध्ये गोगावले, मुंडे भरणे व भूसे या मंत्र्यांचा पालकमंत्रीपदाचा पत्ताच कट करण्यात आला आहे. तर मुश्रीफ, सरनाईक, शिवेंद्रराजे, सावे, पंकजा मुंडे या मंत्र्यांना होमग्राऊंड न देता त्यांची उचलबांगडी दुसर्या जिल्ह्यात करण्यात आली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा देशात चर्चेत आला आहे.या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. कराड सध्या अटकेत आहे. कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत सापडले आहे. मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक तसेच महायुतीतून होत आहे. या प्रकरणावरून भाजपाचे आमदार सुरेश धस प्रचंड आक्रमक आहेत.
सुरेश धस यांनी या वाल्मिक कराड आणि त्याच्या आकाविरोधात मोठा मोर्चा उघडला आहे. सरंपच संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांना आता चांगलेच भोवले आहे. मुंडे यांचा पालकमंत्री पदाचा पत्ता कट झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री असणार आहे. मुंडे यांच्याकडे कोणत्याच जिल्ह्याचे पालकमंत्री असणार नाही. पंकजाताई यांच्याकडे मोठ्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद जाईल अशी अटकळ बांधली जात होती परंतू तसे घडले नाही.पंकजाताई यांच्याकडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
रायगडचे पालकमंत्री कोण होणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. या ठिकाणी शिवसेनेचे मंत्री भरतशेठ गोगावले व राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांच्यात मोठी रस्सीखेच होती. रायगड जिल्ह्यावर आपले वर्चस्व कायम रहावे यासाठी सुनिल तटकरे यांनी पुर्ण ताकद पणाला लावत गोगावले यांचा पत्ता कट करण्यात यश मिळवले. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आदिती तटकरे यांची वर्णी लागली आली आहे. गोगावले यांच्यासाठी हा तगडा झटका मानला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे वजनदार नेते तथा राज्य सरकारमधील जेष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांची अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड होईल असे वाटत असतानाच त्यांची उचलबांगडी थेट विदर्भात करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांची वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रकाश आबीटकर यांची कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून वर्णी लागली आहे.
राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.भरणे हे शिंदे सरकारमध्ये सोलापूरचे पालकमंत्री होते. अजित पवार यांचे विश्वासू सहकारी असलेल्या भरणे यांची वर्णी पुन्हा सोलापूरच्या पालकमंत्री पदी लागेल असे वाटत असतानाच त्यांचा पत्ता कट झाला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून वर्णी लागली आहे.
मुंबई शहरसाठी इच्छूक असलेल्या प्रताप सरनाईक यांची धाराशिवचे पालकमंत्री म्हणून तर छत्रपती संभाजी नगर साठी इच्छूक असलेल्या अतुल सावे यांची नांदेडचे पालकमंत्री म्हणून वर्णी लागली आहे.नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी इच्छूक असलेले शिवसेनेचे मंत्री दादा भूसेंना तगडा झटका बसला आहे. भूसे यांचा पत्ता कट झाला आहे. भुसे हे शिवसेनेतील सर्वात जेष्ठ मंत्री असतानाही त्यांना का डावलण्यात आले ? याबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.
Palak Mantri Maharashtra 2025 Full List : महाराष्ट्र जिल्हानिहाय पालकमंत्री व सह पालकमंत्री यादी 2025
गडचिरोली पालकमंत्री – देवेंद्र फडणवीस
नागपूर पालकमंत्री – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे पालकमंत्री – एकनाथ शिंदे
पुणे पालकमंत्री – अजित पवार
बीड पालकमंत्री – अजित पवार
सिंधुदुर्ग पालकमंत्री – नितेश राणे
अमरावती पालकमंत्री – चंद्रशेखर बावनकुळे
अहिल्यानगर पालकमंत्री – राधाकृष्ण विखे पाटील
वाशिम पालकमंत्री – हसन मुश्रीफ
सांगली पालकमंत्री – चंद्रकांत पाटील
सातारा पालकमंत्री -शंभुराजे देसाई
छत्रपती संभाजी नगर पालकमंत्री – संजय शिरसाट
जळगाव पालकमंत्री – गुलाबराव पाटील
यवतमाळ पालकमंत्री – संजय राठोड
कोल्हापूर पालकमंत्री – प्रकाश आबिटकर,
अकोला पालकमंत्री – आकाश फुंडकर
भंडारा पालकमंत्री – संजय सावकारे
बुलढाणा पालकमंत्री – मंकरंद जाधव
चंद्रपूर पालकमंत्रि – अशोक ऊईके
धाराशीव पालकमंत्री – प्रताप सरनाईक
धुळे पालकमंत्री – जयकुमार रावल
गोंदिया पालकमंत्री – बाबासाहेब पाटील
हिंगोली पालकमंत्री – नरहरी झिरवळ
लातूर पालकमंत्री – शिवेंद्रसिंग भोसले
मुंबई शहर पालकमंत्री – एकनाथ शिंदे
नांदेड पालकमंत्री – अतुल सावे
नंदुरबार पालकमंत्री – मानिकराव कोकाटे
नाशिक पालकमंत्री – गिरीश महाजन
पालघर पालकमंत्री – गणेश नाईक
परभणी पालकमंत्री – मेघना बोर्डीकर
रायगड पालकमंत्री – अदिती तटकरे
रत्नागिरी पालकमंत्री – उदय सामंत
सिंधुदुर्ग पालकमंत्री – नितेश राणे
सोलापूर पालकमंत्री- जयकुमार गोरे
वर्धा पालकमंत्री – पंकज भोयर
जालना पालकमंत्री – पंकजा मुंडे
सह पालकमंत्री कोण?
गडचिरोली सह पालकमंत्री – आशिष जयस्वाल
मुंबई उपनगर सह पालकमंत्री – मंगलप्रभात लोढा
कोल्हापूर सह पालकमंत्री – माधुरी मिसाळ