NCP Supreme Court News : शरद पवार गटाला दिलेल्या नावावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारले ; कारण..

NCP Supreme Court News : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी पार पडली. यावर सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे.

राष्ट्रवादीत अजित पवारांनी बंड केले. बंडानंतर अजित पवार गटाने आम्हीच खरे राष्ट्रवादी हा दावा ठोकला. यावर निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल दिला. या निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. याच याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

यावेळी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी पहिल्यांदा युक्तिवादाला सुरुवात केली. त्यांनी कोर्टाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. या मागण्या सुप्रीम कोर्टाने मान्य करत निवडणूक आयोगाला निर्देश दिले आहेत. तसेच अजित पवार गटाला उद्देशून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांना उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन आठवड्यानंतर होईल, असंही कोर्टानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

NCP Supreme Court News,Supreme Court's big decision on name given to Sharad Pawar group,Ajit Pawar group was reprimanded by Supreme Court, because

शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून आजच्या सुनावणीत युक्तिवादावेळी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. “मराठा आरक्षणासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन होतंय. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला पक्षाचा प्रचार करण्यासाठी पत्रकांची छपाई करावी लागणार आहे. त्यानुसार आम्हाला तात्पुरत्या पक्षाचे नाव, चिन्हं देण्यात येईल ते निवडणुकीपुरता कायम देण्यात यावं”, अशी मागणी सिंघवी यांनी कोर्टात केली. “अजित पवार यांच्या गटाचा व्हीप शरद पवार यांच्या गटाला लागू होत नाही. आमची कोर्टाला विनंती आहे की नाव आणि पक्षाचे चिन्ह पुन्हा कायम स्वरुपासाठी देण्यात यावं”, अशी मागणी सिंघवी यांनी कोर्टात केली.

“आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेलं तात्पुरतं नाव निवडणुकीपर्यंत कायम ठेवा”, अशी मागणी अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात केली. “नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हेच नाव निवडणुकीपर्यंत राहू द्या”, अशी विनंती अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात केली. त्यावर सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले. शरद पवार एक आठवड्यात चिन्हं दिलं जावं, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले.

न्यायमूर्ती विश्वनाथन यांनी यावेळी अजित पवार गटाला काही प्रश्न विचारले. न्यायमूर्ती अजित पवार गटाचे वकील मुकुल रोहतगी यांना उद्देशून म्हणाले. “मुकुल रोहतगी तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या (आयोगाच्या) आदेशात काय लिहिलंय? दोन्ही गटांनी घटना पाळली नाही. कोणीही अपात्र ठरलं नाही. split वगळून merger ची तरतूद करण्यात आली. त्याचा उद्देश काय होता? पण यामध्ये मतदारांचे काय?”, असे सवाल कोर्टाने केले आहेत. याबाबत अजित पवार गटाला पुढील दोन आठवड्यात उत्तर द्यावं लागणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता तीन आठवड्यानंतर होईल, असं कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

निवडणूक आयोगाने अजित पवारांना राष्ट्रवादी आणि पक्षाचे चिन्ह दिल्याविरोधात शरद पवारसर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावेळी अजित पवार गटानेच ऱाष्ट्रवादी शरदचंद्र पवार या नावाला जोरदार आक्षेप नोंदविला आहे.यावर सर्वोच्च न्यायलयाने मतदार हुशार आहे, असे सांगत पुढील तीन आठवडे तेच नाव कायम राहणार असल्याचे निर्देश दिले आहेत.

राष्ट्रवादीचे नाव शरद पवारांच्या गटाला दिल्याने गोंधळ उडेल असा आक्षेप अजित पवारांच्या वकिलांनी घेतला आहे. यावर मतदार हुशार आहे, त्याला कोणाचा पक्ष असेल ते समजते. यामुळे शरद पवारांच्या पक्षाच्या नावावर आक्षेप असण्याचे कारण नाही, असे अजित पवार गटाला सुनावले.

शरद पवार गटाने मिळालेले नाव लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम रहावे, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे. लोकसभा निवडणुकीला कमी काळ राहिला आहे. यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यास उशीर होईल, असे कारण यावेळी देण्यात आले. यावर सर्वोच्च न्यायालयाने तीन आठवड्यांनी सुनावणी घेण्याचे निश्चित केले. तसेच शरद पवार गटाला पक्ष चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करण्यास सांगितले आहे. तसेच आयोगाने नियमानुसार चिन्ह द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.