डाॅ भगवान मुरुमकर यांच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात नागराज मुरुमकर आक्रमक

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या आडूून जामखेडमधील काही लोक मुरुमकर यांच्याविरोधात बदनामीकारक आरोप करत आहेत, त्या सर्वांनी तातडीने मुरुमकर यांची बदनामी थांबवावी, विनाकारण मुरुमकर यांची बदनामी केल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा युवा नेते नागराज मुरुमकर यांनी दिला आहे.

Nagraj Murumkar is aggressive against those accusing Dr Bhagwan Murumkar

जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर यांच्यावर खंडणी आणि खूनाचा प्रयत्न करणे याबाबतचे गुन्हे दाखल झाल्यानंतर मुरुमकर यांच्या विरोधात उद्योजक रमेश आजबे आणि चित्रपट कलावंत संदिप शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते.या आरोपानंतर डाॅ भगवान मुरुमकर यांचे कट्टर समर्थक असलेले नागराज मुरुमकर हे आता आक्रमक झाले आहेत. नागराज मुरुमकर यांनी डाॅ भगवान मुरुमकर यांच्याविरोधात आरोप करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

नागराज मुरुमकर म्हणाले की, ज्या घटनेमध्ये आमचे नेते डाॅ भगवान मुरुमकर यांचा रोल नाही त्या घटनेत मुरुमकर यांचे नाव घेऊन बेछूट आरोप करणारांनी डाॅ भगवान मुरुमकर यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीवर आम्ही अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करणार आहोत,  अंधुरे यांनी जो गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये पोलिस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेवर डाॅ भगवान मुरूमकर यांचा पुर्णपणे विश्वास आहे. जर त्या गुन्हात आम्ही आरोपी आढळुन आलो तर न्यायालय आम्हाला जी सजा देईल ती भोगायला आमची तयारी आहे असेही नागराज मुरुमकर यांनी स्पष्ट केले.

नागराज मुरुमकर पुढे बोलताना म्हणाले की, आमचे नेते डाॅ भगवान मुरुमकर हे गेल्या 22 वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. या काळात त्यांच्यावर साधी एनसीचा गुन्हा दाखल नाही, ते सदैव जनतेच्या सेवेत ते कार्यरत आहेत. सर्वसामान्यांना आपल्या हक्काचा माणूस म्हणून मुरुमकर हे काम करत आहेत. हे जगजाहीर आहे. त्यांना नाहक बदनाम करण्याचे षडयंत्र काही लोक करत आहेत, त्या लोकांनी भगवान मुरुमकर यांच्या ज्या घटनेत संबंध नाही त्या घटनेत त्यांचा संबंध जोडून आपली पोळी भाजू नये, विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न न थांबवल्यास, आरोप करणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा, यावेळी नागराज मुरुमकर यांनी दिला आहे.