MPSC main exam 2020 | एमपीएससीची मुख्य परिक्षा जाहीर, सहा केंद्रावर होणार परिक्षा !

अभियांत्रिकी सेवा मुख्य परिक्षेचीही तारीख जाहीर

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSCच्या मुख्य परीक्षेच्या तारखा सोमवारी सायंकाळी लोकसेवा आयोगाने जाहीर केल्या आहेत.(MPSC main exam 2020 dates announced) ही मुख्य परीक्षा डिसेंबर महिन्यातील 04,05 व 06 या तारखांना होणार आहे. त्याचबरोबर अभियांत्रिकी सेवा मुख्य परिक्षेचीही तारीख आयोगाने जाहीर केली आहे. (Engineering Services Main Exam 2021 Announced)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक सोमवारी जारी केलं आहे.यासंबंधीच्या अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावं, असे देखील आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. (MPSC main exam 2020 dates announced)

आयोगाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्ग/ सेवांमधील भरतीकरीता आयोगामार्फत दिनांक 21 मार्च 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 च्या दिनांक 06 सप्टेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020, दिनांक 04,05आणि 06 डिसेंबर 2021 रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहेत.(MPSC main exam 2020 dates announced)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोना विषाणू संसर्ग आणि आरक्षणाच्या मुद्यामुळं परीक्षा लांबणीवर पडली होती. कोरोनाचं कारण देत आयोगानं परीक्षा लांबणीवर टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यभरात चक्काजाम आंदोलन केल्यानंतर परीक्षा 21 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 03 ते सायंकाळी 05 वाजेपर्यंत अशा दोन सत्रात ही परीक्षा झाली होती. (MPSC main exam 2020 dates announced)

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. त्यात 03 हजार 214 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली असून, मुख्य परीक्षेची अधिसूचना स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली होती.(MPSC main exam 2020 dates announced)

अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेची तारीखही जाहीर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचीही तारीख जाहीर करण्यात आली आहे.(Engineering Services Main Exam 2021 Announced)

अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन येत्या 18 डिसेंबर रोजी केले जाईल. विद्यार्थी मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्याची मागणी आयोगाकडे करत होते. एमपीएससी आयोगाने या तारख्या जाहीर केल्या आहेत