MPSC, State Service Pre-Examination 2021 | अहमदनगरमध्ये 23 रोजी होणार राज्य सेवेची पुर्व परीक्षा, जाणून घ्या परीक्षेचे सविस्तर नियोजन
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC Exam) वतीने घेण्यात येणारी राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – 2021 (State Service (Pre) Examination 2021) रविवार 23 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते सायंकाळी 5 या वेळेत एकूण 34 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित (Sandip Nichit) यांनी दिली आहे. (MPSC, Pre-examination of State Service on 23rd January 2022 in Ahmednagar,How is the exam planned? Find out)
राज्य सेवा (पूर्व) परीक्षा – 2021 या परिक्षेसाठी अहमदनगर शहरातील 34 उपकेंद्रावर एकूण 12456 उमेदवार परिक्षेस बसणार आहेत.परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षाकेंद्रावर सकाळी साडे आठ वाजता प्रवेश देण्यात येणार असून परीक्षेच्या दोन सत्राच्या मधल्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा केंद्राबाहेर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडील पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार 2 जानेवारी 2022 होणा-या मात्र अपरिहार्य कारणामुळे रद्द झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा- 2021 करिता निर्गमित करण्यात आलेली प्रवेशपत्र 23 जानेवारी 2022 रोजी होणा-या राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021 करिता ग्राहय धरण्यात येणार आहेत.
1130 कर्मचारी नियुक्त
या परीक्षेकामी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी -9 , भरारी पथक प्रमुख-2, वर्ग 1 संवर्गातील उपकेंद्र प्रमुख -34 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, मदतनीस असे विविध वर्ग 3 संवर्गातील 1130 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक
परिक्षेस बसलेल्या उमेदवारांनी काळया शाईचे बॉलपॉइंट पेन वापरणे आवश्यक असून उमेदवारांना एकमेकांचे पेन लिखान साहित्य इ. वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व परीक्षार्थी उमेदवार यांनी मुखपट्टी (मास्क), हातमोजे व सॅनिटायजर जवळ बाळगणे अनिवार्य आहे.
डिजीटल साधने बाळगल्यास होणार कठोर कारवाई
मोबाईल पेजर डिजीटल डायरी, मायक्रोफोन, स्मार्टवॉच यांसारखी दूरसंचार साधने व कॅल्क्युलेटर इ. परीक्षा केंद्राच्या परीसरामध्ये आणि परीक्षा दालनात आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारास सदर परिक्षेसाठी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात येणार आहे.
परिक्षा केंद्र परिसरात कलम 144 (3) लागू
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने बंद ठेवणेकामी परिक्षेच्या दिवशी परिक्षाक्षेत्रामध्ये सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 1973 चे कलम 144 (3) लागू करण्यात आलेले आहे असेही संदीप निश्चित यांनी स्पष्ट केले आहे.