Mega Recruitment : महाराष्ट्रात होणार 15 हजार 511 पदांची मेगा भरती : राज्य सरकारकडून जोरदार हालचाली सुरू

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकार येत्या एप्रिल अखेरपर्यंत बंपर मेगाभरती करण्याच्या तयारीत आहे. राज्यातील 25 विभागातील 15 हजार 511 पदांसाठीची मेगा भरती (Mega Recruitment) होणार आहे. सरळसेवा व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून रिक्त पदे भरली जाणार आहेत. सरकारकडून मेगाभरतीच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (MPSC) 7 हजार 460 पदांचे मागणीपत्र सादर केले जाणार आहे. तसेच ऊर्वरीत 8 हजार 61पदांचेही मागणीपत्र लवकरच केले जाणार आहे. या पदभरतीच्या माध्यमांतून गट अ, ब, क वर्गातील रिक्त पदे  भरली जाणार आहेत.

राज्य सरकारच्या महत्त्वाच्या 34 विभागातील एकुण अडीच लाखांपर्यंत पदे रिक्त आहेत. काही पदांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून तर काही पदे थेट खासगी संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने (Information and Technology Department) यापूर्वीच पाच संस्थांची निवड केली आहे.

वित्त विभागाने (Finance Department) विविध विभागांमधील महत्त्वाची पदे भरायला मान्यता दिल्याने रिक्‍त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे (Covid-19) राज्याची आर्थिक स्थिती विस्कटली आणि महसूल (Revenue) मोठ्या प्रमाणावर कमी झाला. त्यामुळे सर्व रिक्‍त पदांची भरती होऊ शकली नाही.

तत्कालीन फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात जवळपास 70 हजार पदांची मेगाभरती (Mega Recruitment) होईल, अशी घोषणा झाली, परंतु पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. महाविकास आघाडी सरकारनेही (Mahavikas Aghadi Government) सुरवातीला घोषणा केली, परंतु कोरोनाच्या संकटामुळे अजूनपर्यंत तेवढ्या पदांची भरती झालेली नाही. आता टप्प्याटप्प्याने पदभरती केली जात आहे.

.