IPS Officer Transfer Maharashtra | गृहविभागाकडून अति वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : IPS Officer Transfer Maharashtra |  राज्याच्या गृह विभागाने दोन अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या आज बदल्या केल्या आहेत. गृहविभागाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. बदली झालेल्या बड्या आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (addl cp ramnath pokale) आणि पोलिस उप महानिरीक्षक हरीश बैजल (harish baijal ips) यांचा समावेश आहे.

गृहविभागाकडून करण्यात आलेल्या बदल्यांनुसार  वरिष्ठ आयपीएस अधिकारी  हरिश बैजल यांची सोलापूरच्या पोलिस आयुक्त पदी (solapur police commissioner) नियुक्ती करण्यात आली आहे. (IPS Officer Transfer Maharashtra) तर अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहरमध्ये असलेली आदेशाधीन बदली रद्द करत त्यांची नियुक्ती पुणे पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत (Pune Police Crime Branch) करण्यात आली आहे. (IPS Officer Transfer Maharashtra)

पोलिस उप महानिरीक्षक हरीश बैजल यांची (सायबर व म.अ.प्र., महाराष्ट्र राज्य, मुंबई) येथून सोलापुर शहराच्या पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, अनिल कुंभारे addl cp anil kumbhare (अप्पर आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर) यांची दि. 23 ऑगस्ट रोजी नागपुर येथे करण्यात आलेली बदली सध्या रद्द करण्यात आली आहे.

अप्पर आयुक्त दत्ता कराळे (datta karale ips) याचीं दि. 23 ऑगस्ट 2021 रोजी पोलिस आयुक्त (सोलापूर शहर) म्हणून करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे.गृह विभागाकडून अवर सचिव तुषार महाजन (Tushar Mahajan) यांनी यासंदर्भातील आदेश आज काढले आहेत.

Web Title : IPS Officer Transfer Maharashtra | Harish Baijal Solapur new police commissioner Additional Commissioner Ramnath Pokale in Pune Crime Branch