maharashtra covid cases today | राज्यात कोरोनाचा विस्फोट, आजचा आकडा राज्याची डोकेदुखी वाढवणारा

maharashtra covid cases today | जामखेड टाईम्स वृत्तसेवा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोरोनाने राज्याला सर्वात मोठा दणका दिला आहे. (Corona eruption in the maharashtra state, today’s figure raises the headaches of the state)

राज्यात शुक्रवारी दिवसभरात 8 हजार 67 नवे रूग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच राज्यात ओमिक्रॉन 4 रूग्ण आढळून आले आहेत.

राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने सरकारचे टेन्शन वाढले आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात आधीच निर्बंध लावण्यात आलेले असतानाच आता निर्बंध अधिक कठोर केले जाणार असल्याचे संकेत सरकारकडून मिळू लागले आहेत.

राज्यात शुक्रवार दिवसभरात एकुण 1 हजार 766 रूग्ण बरे होऊन घरी परतले. तर 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  राज्यात आज अखेर 1 लाख 75 हजार 592 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 1079 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 24 हजार 509 इतकी झाली आहे.

राज्यात शुक्रवारी ओमिक्रॉनचे 4 रूग्ण आढळून आले. यामध्ये वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील ऐकेका रूग्णाचा समावेश आहे.  राज्यात आज अखेर 454 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. यातील 157 रूग्णांचे RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.

राज्यात सर्वाधिक सक्रीय कोरोनाबाधित मुंबई जिल्ह्यात आहेत. मुंबईतील रूग्णांची संख्या 16 हजार 441 इतकी झाली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या 369 इतकी झाली आहे.

राज्य सरकारमधील अनेक मंत्री तसेच आमदारांना कोरोनाचा तडाखा बसला आहे. अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

इथे पहा आजची महाराष्ट्राची  (31 डिसेंबर 2021) कोरोना स्थिती