Maharashtra Cabinet Expansion news : राज्य मंत्रिमंडळ विस्तारचा मुहूर्त ठरला, येत्या आठवडाभरात होणार मंत्रिमंडळाचा विस्तार? राजकीय हालचालींना वेग

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : 30 जून 2023 : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येऊन वर्षे पुर्ण झाले आहे. सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही झालेला नाही. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विरोधकांनी सरकारवर सातत्याने टीकेची झोड उठवली आहे. अश्यातच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर येत आहे. येत्या आठवडाभरात मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो असे वृत्त आहे. यामुळे राज्याच्या राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. (Maharashtra Cabinet Expansion news)

Maharashtra Cabinet Expansion news, Breaking, time for expansion of maharashtra cabinet has been decided, will expansion of cabinet take place in next week? political movement Speed ​​up

जूनच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असे बोलले जात होते पण जून उलटून गेला तरी मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. सरकारला 30 जून म्हणजे आज सत्तेत येऊन एक वर्षे पुर्ण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार कधी? याची जनतेसह भाजप शिवसेना व मित्रपक्षांच्या आमदारांना उत्सुकता आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपला समावेश व्हावा याकरिता अनेक आमदारांनी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यांची मंत्रिपदाची इच्छा कधी पुर्ण होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांनी तातडीने दिल्लीचा दौरा करत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. गुरूवारी रात्री दोन्ही नेते दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना जोर आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. जुलैमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होईल. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील असे फडणवीस म्हणाले.

जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार – देवेंद्र फडणवीस

फडणवीस पुढे म्हणाले की, राज्याच्या काही महत्वाच्या प्रश्नांवर केंद्राकडे पाठपुरावा करायचा होता, म्हणून आम्ही गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्ताराचे सुत्र ठरवण्यात आले आहे. जुलै महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील.

पुढच्या आठवड्यात विस्तार- संजय शिरसाट

तर शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केंद्र आणि राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया पुढच्या आठवड्यात होईल, असं सांगितलं आहे. कुणा संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार, हे ठरवण्याचे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. शिंदे गटाला केंद्रीय मंत्रिमंडळातही दोन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. ही मंत्रीपदं मिळाली तर महाराष्ट्राला त्याचा फायदाच होईल, असंही शिरसाट म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या काही मंत्र्यांना डच्चू ?

शिवसेनेतील काही मंत्र्यांची कामगिरी सुमार काही. काहींच्या कामावर भाजपातील मोठा गट व संघ परिवार नाराज आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या तीन ते चार मंत्र्यांना घरी बसवले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले असले तरी शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार नेमकं काय घडतं याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.