जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील जवळा येथील पैलवान रोहित आव्हाड हा यावर्षीचा ‘माण अभिमान केसरी ‘ ठरला असून, त्याने मानाची चांदीची गदा पटकावली आहे.रोहितच्या यशामुळे जवळा गावचे नाव महाराष्ट्रात झळकले आहे.
सातारा जिल्ह्यातील माण अभिमान केसरी कुस्ती मैदान कुस्ती शौकीनांसाठी प्रतिष्ठेची समजली जाते. कोजागिरी उत्सवानिमित्त माण तालुक्यातील पिसाळवाडी येथे कुस्ती मैदान भरवण्यात आले होते. याठिकाणी प्रतिष्ठेची कुस्ती जिंकत पैलवान रोहित आव्हाड याने चांदीची गदा आणि माण अभिमान केसरी किताब पटकावला.
पैलवान रोहित आव्हाड हा गेल्या वर्षापासून कोल्हापुर येथील गंगावेश तालमीत सराव करत आहे.यापुर्वी जवळा येथील शिवगर्जना तालिमीत रोहित सराव करत होता.
जवळा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य संजय आव्हाड यांचा रोहित हा चिरंजीव आहे. पैलवान रोहित याने प्रतिकुल परिस्थितीत शरीर कमवत कुस्तीमध्ये नाव कमावत आहे. रोहितने मिळवलेल्या यशामुळे जवळ्याचे महाराष्ट्रात झळकत आहे.
या यशाबद्दल पैलवान रोहित आव्हाड याचे आ.प्रा.राम शिंदे, आ.रोहित पवार, ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, माजी उपसभापती दिपक पाटील, सरपंच प्रशांत शिंदे, माजी सरपंच प्रदिप दळवी, जवळा सेवा संस्थेचे अध्यक्ष शहाजी पाटील, संतराम सूळ, प्रशांत पाटील, बाबा महारनवर, उपसरपंच काकासाहेब वाळुंजकर,राहूल पाटील यांनी अभिनंदन केले आहे.