Success Story : याला म्हणायचं यश ! जामखेडच्या मातीचा डंका वाजणार विदेशात, Shivtej Thorat ची जागतिक दर्जाच्या Epic Garments कंपनीत इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग ऑफिसर म्हणून निवड !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । success story : खर्डा प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष थोरात यांचे चिरंजीव शिवतेज थोरात याची जागतिक दर्जाच्या इपिक कंपनीत इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग ऑफिसर (Industrial Engineering Officer) या पदावर नुकतीच निवड झाली आहे. जागतिक कापड उद्योग क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या इपिक कंपनीच्या बांग्लादेश युनिटमध्ये तो ज्वाॅईन होणार आहे.(Epic Garments Manufacturing co Ltd )

Jamkhed's soil will sound abroad, Shivtej Thorat's selection as an industrial engineering officer in world-class EPIC GARMENTS company Bangladesh, Garments job news,

दुष्काळग्रस्त जामखेड तालुक्यात गुणवंत विद्यार्थ्यांची खाण आहे. तालुक्यातील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चमकून जगाच्या पाठीवर जामखेड तालुक्याची मान अभिमानाने उंचावत आहेत.कापड उद्योगाकडे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे सहसा दुर्लक्ष होताना आपण पाहतो, कारण विद्यार्थ्यांना या उद्योगाविषयी, त्यातील मोठ्या संधी विषयी माहिती नसते, मार्गदर्शन नसते. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा पारंपारिक अभियांत्रिकीच्या शाखांकडे कल असतो, परंतू खर्डा येथील शिवतेज थोरात याने याला छेद देत टेक्सटाईल इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदाची नोकरी मिळवली आहे.

शिवतेज थोरात याला त्याचे आजोबा, वडिल संतोष थोरात, आई, मामा, चुलते यांनी अचूक मार्गदर्शन करत टेक्सटाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण दिले.शिवतेज याने घेतलेली कठोर मेहनत आणि त्याला कुटुंबाची मिळालेली साथ यामुळे शिवतेज थोरात याची बांग्लादेश स्थित जागतिक दर्जाच्या इपिक कंपनीत प्लेसमेंट झाली आहे. येत्या ऑगस्टमध्ये शिवतेज हा कंपनी ज्वाॅईन करणार आहे. या कंपनीत तो इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग ऑफिसर या महत्वाच्या पदावर नोकरीस रूजू होणार आहे.

शिवतेज थोरातचा शैक्षणिक प्रवास

शिवतेज थोरात हा खर्डा येथील रहिवासी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण (पहिली ते सातवी) जामखेडच्या खेमानंद इंग्लिश स्कूलमध्ये झाले. तर आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण इंदौरच्या चमेलीदेवी पब्लिक स्कुलमध्ये झाले. त्यानंतर त्याने अकरावी व बारावीचे शिक्षण छत्रपती विद्यालय खर्डा येथे घेतले. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथे गेला होता.

शिवतेज थोरातचे उच्च शिक्षण कुठे झाले ?

शिवतेज थोरात याने इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम इंजिनिअरिंग काॅलेजमध्ये (dattajirao kadam college of engineering ichalkaranji) टेक्सटाईल इंजिनिअरिंग विषयात शिक्षण घेतले. बी टेक टेक्सटाईल टेक्नॉलॉजी व ऑनर्स टेक्निकल टेक्सटाईल अश्या दोन पदव्या त्याने विशेष प्राविण्यासह मिळवल्या आहेत.

काॅलेज कॅम्पस प्लेसमेंट मधून शिवतेजची निवड

डिसेंबर 2022 मध्ये त्याच्या काॅलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टेक्सटाईल उद्योगातील जागतिक दर्जाच्या अनेक कंपन्या मुलाखतीसाठी आल्या होत्या. त्यामध्ये इपिक कंपनीचा समावेश होता. इपिक कंपनीच्या मुलाखतीत शिवतेज पास झाला. त्याची कंपनीत इंडस्ट्रीयल इंजिनिअरिंग ऑफिसर म्हणून निवड झाल्याचे पत्र त्याला प्राप्त झाले आहे. तो येत्या ऑगस्ट महिन्यात बांग्लादेशला जाणार आहे. जगातल्या अनेक देशात इपिक कंपनीचा विस्तार आहे. शिवतेज थोरात याची या कंपनीत महत्वाच्या पदावर निवड झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.

खर्डा ग्रामस्थांकडून शिवतेज थोरातचा नागरी गौरव !

खर्डा गावचा भूमिपुत्र शिवतेज संतोष थोरात याची आंतरराष्ट्रीय कंपनीत महत्वाच्या पदावर निवड होताच त्याचा खर्डा ग्रामस्थांनी नुकताच नागरी सत्कार करत त्याने मिळवलेल्या यशाचा गौरव केला. सरपंच संजीवनीताई पाटील यांनी शिवतेज थोरात याचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करत गौरव केला.

Jamkhed's soil will sound abroad, Shivtej Thorat's selection as an industrial engineering officer in world-class EPIC GARMENTS company Bangladesh, Garments job news,

यावेळी माजी सरपंच नमिता गोपाळघरे, माजी उपसरपंच रंजना लोखंडे, ग्रामपंचायत सदस्या शितल सुग्रीव भोसले, कांचन गणेश शिंदे, सुनीता दीपक जावळे, पुनम अशोक खटावकर,ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील,वैभव जमकावळे ,महालिंग कोरे, डॉ गोपाळघरे, राजू मोरे, नवनाथ होडशीळ, भीमराव घोडेराव, अशोक खटावकर, आसाराम गोपाळघरे, जयदत्त योगे,पोलीस नाईक संभाजी शेंडे,गजेंद्र काळे, शहाबाज शेख, दत्ता गवसने, अंकुश काळे,ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मातृभूमीचे प्रेम कधीच विसरणार नाही – शिवतेज थोरात

खर्डा ग्रामस्थांनी नागरी सत्कार केल्यानंतर शिवतेज थोरात याने आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना तो म्हणाला की, मायभूमीत आज झालेला सत्कार आणि कौतुकाची थाप ही जगातील सर्वात मोठ्या बक्षिसापेक्षा मोठी आहे. ज्या मातीत जन्मलो, वाढलो, त्या मातीने केलेला गौरव ऊर्जादायी आहे. मला मिळालेले यश हे आई वडील शिक्षक, नातेवाईक व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने, सहकार्याने मिळाले आहे. मी कामानिमित्त परदेशात गेलो तरी मी मातृभूमीचे प्रेम कधीच विसरणार नाही. देश सेवा व मातृभूमीचे प्रेम हे सदैव स्मरणात राहील, अशी भावना शिवतेज याने व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनो कठोर मेहनत घ्या, यश तुमच्या मागे धावेल

शिवतेज पुढे म्हणाला की, जागतिकीकरण झपाट्याने वाढत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगात वेगाने बदल घडत आहेत. या स्पर्धेत टिकण्यासाठी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण घेऊन युवकांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. नव्या क्षेत्रात संधी शोधली पाहिजे, यश मिळायचे असेल तर आपला फोकस क्लिअर असायला हवा,मोबाईलच्या नादी न लागता विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावे, कठोर मेहनत घ्यावी,आई वडीलांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट वाया जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, विद्यार्थ्यांनो कठोर मेहनत घ्या, यश तुमच्या मागे धावेल,असे सांगत शिवतेज म्हणाला की, खर्डा ग्रामपंचायतने ग्रामस्थांच्या मदतीने युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरू करावे.