जामखेड : लोणी फाट्यावर तिरट जुगार अड्ड्यावर खर्डा पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

जामखेड : खर्डा-जामखेड रस्त्यावरील लोणी फाटा परिसरात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर खर्डा पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी एकूण २९ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Jamkhed, Kharda police raid Tirat gambling den at Loni Phata,case registered against six individuals

खर्डा पोलिस स्टेशनच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरोधात खर्डा पोलिसांनी कठोर  कारवाई हाती घेतली आहे. पोलिसांनी खर्डा रोडवरील लोणी फाटा येथील हॉटेल ओम साईच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर धाड टाकली.

या कारवाईत सहा जुगाऱ्यांना पोलिसांनी पकडले. पोलिस कर्मचारी योगेश कर्डिले यांनी फिर्याद दिली. बाबु केकाण, राहुल पवार, टी के फुंदे, अनिल दराडे, गणेश गिते, भरत गिते या सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खर्डा पोलिस करत आहेत.