जामखेड : फक्राबाद शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ऊबाळे तर उपाध्यक्षपदी जायभाय

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील फक्राबाद जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडीत अध्यक्षपदी शरद मारुती ऊबाळे, तर उपाध्यक्षपदी सीमा महेंद्र जायभाय यांची निवड करण्यात आली.

Ubale Appointed President and Jaybhay Vice-President of Fakhrabad School Management Committee, Jamkhed News,

समितीच्या सदस्यपदी अश्विनी परशराम राऊत, मोहनिराज किसन आढाव, दत्तात्रय यादव जगताप, भाऊसाहेब आनंदराव राऊत, अमीर इब्राहिम शेख, संतोष रावसाहेब आमटे, नयन महेश गणगे, सुषमा रविंद्र मोहळकर, आरती गोवर्धन बांडराव, पल्लवी मारुती शिंदे आणि स्वाती अमोल देशपांडे यांची निवड झाली. तसेच संतोष हरिभाऊ राऊत यांची शिक्षणतज्ज्ञ म्हणून निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे पालक व  ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण जायभाय, पोलीस पाटील योगीनाथ जायभाय सह आदी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र हजारे यांनी सूत्रसंचालन केले, तर मुख्याध्यापक किरण फापाळे यांनी आभार मानले.

शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार नवनिर्वाचित समितीने व्यक्त केला.