व्हा सज्ज ! गृहमंत्र्यांकडुन पोलिस भरतीची तारीख जाहीर 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज एक खुशखबर दिली आहे. पोलिस भरती प्रक्रिया कधी पासून सुरू होणार याची उत्सुकता आता संपली संपली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस भरती संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. (Home Minister announces date for police recruitment)

गृहविभागाकडुन 7000 हजार पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. सध्या राज्यात 50 हजार पोलिसांची रिक्त पदे आहेत. त्यातील साडेपाच हजार पोलिस शिपायांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आता नव्याने सात हजार पदांची पोलीस भरती लवकरच सुरू होणार आहे. 15 जून पासून ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

सात हजार पोलिस शिपाई भरती प्रक्रिया झाल्यानंतर पुढच्या टप्प्यांमध्ये पंधरा हजार पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे, या भरतीला राज्य मंत्रिमंडळाकडून परवानगी मिळेल असा विश्वास व्यक्त करत वळसे पाटील पुढे म्हणाले की,पोलिसांवर सध्या खूप मोठा ताण आहे, तो दुर करण्यासाठीच पोलिसांचे संख्याबळ वाढवण्याचे राज्यसरकारचे धोरण आहे. नव्याने होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी वळसे-पाटील म्हणाले.