बंधा-याच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील दुर्घटना !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : लग्नासाठी लातूरमध्ये आलेल्या दोघा सख्ख्या भावांचा एकाचा बंधाऱ्यातील पाण्यात बुडून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना लातूर जिल्ह्यातून समोर आले आहे. (Three persons including two brothers drowned in Jalkot taluka of Latur district)

याबाबत सविस्तर असे की लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द या गावामध्ये तुळशीराम राम तेलंगे यांच्या मुलीचा विवाह होता या विवाहासाठी लाळी खुर्द गावामध्ये पै  पाहुण्यांची रेलचेल होती. लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांची मुले गावाजवळ असलेल्या तिरु नदीच्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेली होती.

बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने ही तीनही मुले तोल जाऊन बंधाऱ्याच्या खोल पाण्यात बुडाली. यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे लाळी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.

या दुर्दैवी घटनेमध्ये चिमा बंडू तेलंगे आणि संगमेश्वर बंडू तेलंगे या दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे दोन्ही भावंडे चिमेगाव येथील रहिवासी आहेत. तसंच या घटनेमध्ये दापका राजा येथील एकनाथ तेलंगे या मुलाचाही या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तेलंगे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.