आनंदाची बातमी : येत्या 48 तासात मान्सून बंगालच्या उपसागरावर धडकणार

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | monsoon in india 2022 | उष्णतेच्या प्रकोपाने यंदा भारतीय उपखंडात मोठा हाहाकार माजवला आहे. भारतासह पाकिस्तान आणि अन्य भागात यंदा उष्णतेची तीव्र लाट सक्रीय आहे. उकाड्याने होरपळून निघालेल्या जनतेसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली. यंदा वेळेच्या आधीच मान्सून भारतात दाखल होणार आहे. पावसाच्या आगमनानंतर उष्णतेच्या लाटेला लाटेपासून सुटका होणार आहे. (Good news Monsoon will hit Bay of Bengal in next 48 hours)

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा केरळात वेळेच्या आधी मान्सून दाखल होणार आहे. परंतू येत्या ४८ तासात बंगालच्या उपसागरावर मान्सून दाखल होणार असल्याचेही हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. 
सध्या बंगालच्या उपसागरात सक्रीय असलेले असनी (Hurricane) चक्रीवादळ निवळत आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांकरीता पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे विनाअडथळा मान्सून दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरावर १५ मे दिवशी मान्सून दाखल होणार असल्याचे अंदाज हवामान अगोदर येण्याची शक्यता वर्तवली होती. यामुळे राज्यात (state) विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात असलेली उष्णतेची लाट पुढचे २-३ दिवस कायम राहणार आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि कोकणामध्ये (Konkan) हवामान कोरडे राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सून पुढील २ दिवसांत अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरवर्षी मान्सून अंदमानात १८ ते २० मेच्या दरम्यान दाखल होत असतो.मात्र, अनुकूल स्थितीमुळे तो ५ दिवस अगोदर येण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत मान्सून अंदमान- निकोबार बेटांचे संपूर्ण क्षेत्र, अंदमानचा समुद्र आणि मध्य- पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भाग व्यापणार आहे, अशी माहिती मिळत आहे. यामुळे यंदा केरळात वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही खूशखबर आहे.

पुढील ४ आठवड्यात भारतीय विभागाने देशभरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये पहिल्या आठवड्यात अंदमान समुद्रावर पावसाच्या सरी बरसणार असण्यची शक्यता वर्तवली आहे. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात अरबी समुद्रावर आणि यापुढील आठवड्यात दक्षिण द्वीपकल्प आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

तिकडे देशात वेळेआधीच मान्सून दाखल होणार आहे. मान्सूनचे संपुर्ण देशभरात काही काळ लोटणार असला तरी, देशाच्या काही भागात अवकाळी वादळी सरी कोसळण्याची शक्यता आहे. मागील वर्षी पावळ्यात मोठे नुकसान झाले होते. महापुराने देशातील अनेक भागात नुकसान केले होते. यंदा तशीच स्थिती ओढवण्याचा धोका कायम आहे.