Fatima Shaikh Google Doodle : भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांना गुगलकडून अनोखी मानवंदना

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख (Fatima Shaikh first Muslim teacher in India) यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त (Fatima Shaikh 191st birth Anniversary) गुगलने अनोखी मानवंदना दिली आहे. गुगलने गुगल डूडल (Fatima Shaikh Google Doodle) साकारत फातिमा शेख यांच्या कार्याला सलाम केला आहे.

भारतातील मुलींची पहिली शाळा काढणाऱ्या सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या सहकारी असलेल्या फातिमा शेख (Fatima Shaikh birth Anniversary) यांची आज जयंती आहे.भारतातील वंचित घटकांना शिक्षण मिळावं यासाठी मोलाचं काम फातिमा शेख (Fatima Shaikh) यांनी केलं आहे. भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका म्हणून त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सोबत काम केलं.फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त गुगलनं (Google) एक डूडल साकारलं आहे. यात त्यांच्या फोटोसह पुस्तकाचं कव्हर दिसून येत आहे. (India’s first Muslim teacher Fatima Shaikh pays tribute Google Doodle)

इंग्रज राजवटीत भारतात दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजातील मुलं आणि स्त्रिया शिक्षणापासून वंचित होत्या. त्यांना शिक्षणाचा हक्क मिळावा अशी ठाम भूमिका घेऊन फातिमा शेख यांनी अस्पृश्य आणि मुस्लिम समाजातील स्त्रिया व मुलांना शिकविण्याचे काम केले. सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले (Jyotirao Phule) यांनी हाती घेतलेल्या सामाजिक सुधारणेच्या कार्यात फातिमा शेख (Fatima Shaikh) यांचा सक्रीय सहभाग होता.

फातिमा शेख यांचा जन्म 09 जानेवारी 1831 साली झाला. (Fatima Shaikh was born on 09 January 1831) आज त्यांची 191 वी जयंती आहे. फातिमा शेख या उस्मान शेख यांच्या भगिनी होत्या. (Fatima Shaikh was sister of Usman Shaikh) मुलींची शाळा काढल्यानंतर जेव्हा महात्मा फुलेंना (Mahatma Phule) त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढलं. त्यावेळी उस्मान शेख (Usman Shaikh) यांनी त्यांना आश्रय दिला. त्याच उस्मान शेख यांच्या फातिमा शेख ही बहिण होती. ‘सावित्रीबाई फुले समग्र वांङ्मय’ या पुस्तकात एक फोटो आहे, ज्यामध्ये सावित्रीबाईंच्या शेजारी आणखी एक महिला बसली आहे. ही महिला म्हणजेच फातिमा शेख होय.

दलित, वंचित आणि स्त्रियांना शिक्षण दिलं म्हणून फुले दांपत्याला अनेक त्रास सहन करावे लागले. सावित्रीबाईंना तर अपमान, शिव्या, अंगावर शेण फेकणे अशा अनेक यातना सहन कराव्या लागल्या. साहजिकच या काळात सावित्रीबाईंसोबत सहशिक्षिका म्हणून काम करताना फातिमा शेख यांनाही अशाच प्रकारच्या त्रासाला तोंड द्यावं लागलं असेल.

सावित्रीबाईंनी ज्योतिबांना लिहिलेल्या एका पत्रात फातिमा शेख यांचा उल्लेख सापडतो. सावित्रीबाईंची तब्येत खराब असताना त्यांनी 10 ऑक्टोबर 1856 साली महात्मा फुलेंना एक पत्र लिहिलं होतं. त्या लिहितात, “माझी काळजी करू नका, तब्येत ठीक होताच मी पुण्यात परत येईन. फातिमाला सध्या त्रास होत असेल पण ती कुरकुर करणार नाही.”

सावित्रीबाईंच्या अनुपस्थिती शाळेची जबाबदारी फातिमा यांनी समर्थपणे सांभाळली. फातिमा या सावित्रीबाईंच्या मैत्रीण आणि सहकारी होत्या. त्यांना स्वतःचं अस्तित्व होतं आणि सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्या वंचिताच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढल्या. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने आपल्या डुडलद्वारे त्यांचा सन्मान केला आहे.

सावित्रीबाई म्हणत की, माझ्या अनुपस्थितीत माझी सहकारी शाळेचं सगळं काम नीटपणे सांभाळेल, काहीही तोशीस पडू देणार नाही. सावित्रीबाईंच्या अनुपस्थितीत त्यांनी सुरू केलेल्या शाळेची धुरा समर्थपणे वाहणारी स्त्री म्हणजे फातिमा शेख. सावित्रीबाईंच्या या सहशिक्षिकेविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंच्या कार्याबद्दल समग्रमपणे लिहिणाऱ्या लोकांकडेही फातिमा शेख यांच्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही.

गुगलची फातिमा शेख यांना अनोखी मानवंदना

भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांची आज 191 वी जयंती आहे. यानिमित्ताने गुगलने एक डूडल सादर केले आहे. या गुगल डूडलमध्ये पांढर्‍या, पिवळ्या, निळ्या रंगाच्या या डूडलमध्ये दोन उघड्या पुस्तकांसह फातिमा शेख यांचं चित्र देण्यात आलं आहे. जगभरात गुगलच्या माध्यमांतून फातिमा शेख यांना आज मानवंदना दिली जात आहे. (India’s first Muslim teacher Fatima Shaikh pays tribute Google Doodle)