e kyc portal | पीएम किसानसाठी ‘ई-केवायसी’ ची अंतिम मुदत जाहीर 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) पोर्टलवरील (e kyc portal) नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना एप्रिल-जुलै २०२२ च्या मदतीसाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत ‘ई-केवायसी’ पूर्ण करणे बंधनकारक आहे. (PM Kisan e-KYC deadline announced)

ई केवायसी संदर्भात जनजागृती अभियान राबविण्यात यावे कृषी आयुक्तालय पुणे येथील उपआयुक्त (कृषिगणना) तथा पथक प्रमुख पी.एम. किसान योजना विनयकुमार आवटे यांनी  राज्यातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे सुचना जारी केल्या आहेत.

विशेष जनजागृती मोहिम राबवून राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्याना ई-केवायसी e kyc online करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान ) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील Farmer Corner या टॅब मध्ये किंवा पी. एम. किसान ऐपद्वारे ओटीपी प्राप्त करून लाभार्थीना स्वतः ई-केवायसी   प्रमाणीकरण मोफत करता येईल.

ग्राहक सेवा केंद्रावर Customer Service Center ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्रावर बायोमॅट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण (E-KYC authentication biometric)करण्या साठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रु. 15 फक्त निश्चित करण्यात आले आहे.अशा सूचना आवटे यांनी परिपत्रकात दिल्या आहेत. (e kyc portal, PM Kisan e-KYC deadline announced, e kyc epfo, Farmer Corner, Customer Service Center)