Today’s Corona status of Maharashtra | राज्याची आजची कोरोना स्थिती  : नवोदय विद्यालयात कोरोनाचा शिरकाव ; ओमिक्रॉनचे 20 रूग्ण,12 मृत्यू, 1410 नवे रूग्ण

जामखेड टाईम्स वृत्तसेवा ।  एकिकडे ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने देशाची चिंता वाढलेली असतानाच महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. राज्य सरकारने नवे निर्बंध राज्यात लागू केले आहेत. त्यातच पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर या गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.Today’s Corona status of Maharashtra

कोरोना महामारीमुळे राज्यातील शाळांची पुरती वाट लागली आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. आता कुठे शाळा सुरू झाल्या होत्या. शाळा सुरू झाल्याचा आनंद ओसरत नाही तोच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. शालेय विद्यार्थी कोरोना बाधित आढळून येण्यास सुरूवात झाल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अश्यात अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर (तालुका पारनेर) येथील जवाहर नवोदय विद्यालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या शाळेतील तब्बल 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. या सर्वांवर पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान या रूग्णांना ताप आल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना बाधित विद्यार्थ्यांच्या संपर्कातील इतर विद्यार्थ्यांचीही तपासणी केली जात आहे. या सर्वांच्या तपासणी नंतरच जवाहर नवोदय विद्यालयाच्या कोरोनाचे चित्र स्पष्ट होईल.

अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव

जगाची झोप उडवून देणाऱ्या ओमिक्रॉनने शुक्रवारी 24 रोजी अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला. नायजेरियाहून आलेल्या एका 41 वर्षीय महिलेला ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. सदर रूग्ण श्रीरामपूर तालुक्यातील आहे. या महिलेच्या संपर्कातील इतरांचे रिपोर्ट येणे अजून बाकी आहेत.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनने पार केले शतक

महाराष्ट्रात ओमिक्रॉन रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज्यात शुक्रवारी 20 रूग्ण आढळून आले आहेत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालात 14 तर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे यांच्या अहवालात 6 रूग्ण आढळून आले आहेत.

शुक्रवारी आढळून आलेले ओमिक्रॉन रूग्ण खालील प्रमाणे

पुणे मनपा 01
पुणे छावणी बोर्डे
05
मुंबई 11
अहमदनगर01
सातारा02

राज्यात आजवर आढळून आलेले ओमिक्रॉन रुग्ण खालील प्रमाणे

शहर रुग्णसंख्या
मुंबई 46
पिंपरी चिंचवड 
19
पुणे ग्रामीण 15
पुणे मनपा
07
सातारा 05
उस्मानाबाद 05
कल्याण डोंबिवली 02
बुलढाणा 01
नागपूर
02
लातुर 01
वसई विरार
01
ठाणे मनपा
02
मीरा भाईंदर 02
अहमदनगर 01

आज आढळून आलेल्या 20 ओमिक्रॉन रुग्णांपैकी 15 जण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत. तर एक आंतरदेशीय प्रवासी आहे. तसेच 04 जण निकटसहवासित आहेत. तसेच या रुग्णांपैकी एक जण 18 वर्षाखालील बालक तर 06 जण 60 वर्षांवरील आहेत. आज आढळून आलेले सर्व रूग्ण लक्षणे विरहित आहेत. शुक्रवार आढळून आलेल्या 20 ओमिक्रॉन रुग्णांपैकी 12 रूग्णांचे पुर्ण लसीकरण झालेले आहे. तर 07 रूग्णांचे लसीकरण झालेले नाही. तर एक रूग्ण लसीकरणासाठी पात्र नाहीत.

शुक्रवार अखेर राज्याची कोरोना स्थिती काय ?

महाराष्ट्रात 24 नोव्हेंबर अखेर 65 लाख 01 हजार 243 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शुक्रवारी दिवसभरात राज्यात 868 जण बरे होऊन घरी परतले. तर 1410 नवीन रूग्णांची राज्यात भर पडली. तसेच शुक्रवारी दिवसभरात 12 कोरोनाबाधितांचा राज्यात मृत्यू झाला आहे. राज्यात आज अखेर  86 हजार 815 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 886 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील रूग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण 97.69 % इतके आहे अशी माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.