Nitin Desai | या कारणामुळे कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची राजकीय वर्तुळात होती विशेष ओळख, विधानसभेची निवडणूक झाली की नितीन देसाई यांच्याकडे असायची मोठी जबाबदारी !

मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्येनं (Suicide) सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी कर्जत येथील त्यांच्या एन.डी. स्टुडिओमध्ये (ND Studio Karjat) त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं.त्यांच्या अचानक एक्झिटने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्रख्यात कला दिग्दर्शकाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं असावं? याबाबत आता वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेनं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

नितीन देसाई (Nitin Desai) यांची राजकीय वर्तुळात विशेष ओळख होती. राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या की त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडायची. नितीन देसाई यांनी कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय कामं केली आहेत. त्यापैकी महत्वाचं काम म्हणजे महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी मंच उभारणे. गेल्या २० वर्षांत महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेचे जितके मुख्यमंत्री बनले त्यांच्या स्टेजची सजावट खुद्द नितीन देसाई यांनीच केली होती. याच कारणामुळे त्यांची राजकीय वर्तुळात विशेष ओळख होती.

राज्यात 2019 मध्ये सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती. शिवाजी पार्कवर लाखो जनतेच्या समोर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली होती.या समारंभासाठी नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या देखरेखीखाली भव्य मंच तयार करण्यात आला होता, अवघ्या २० तासांत त्यांनी हा भव्य मंच तयार केला होता. विशेष बाब म्हणजे म्हणजे सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांची विशालकाय मूर्ती त्यांनी बनवली होती.नितीन देसाई यांच्या या कामाचे त्यावेळी प्रचंड कौतुक झाले होते.

Due to this reason famous art director Nitin Desai had special identity in political circle, when assembly elections were held, Nitin Desai would have big responsibility, nitin Desai latest news,

1995 साली जेव्हा पहिल्यांदा शिवसेना आणि भाजपाचे सरकार आले होते, तेव्हा शिवसेनेच्या मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्या मंचाची सजावट ही देखील नितीन देसाई (Nitin Desai) यांनीच केली होती. एवढेच नव्हे तर 2014 साली जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, तेव्हाही मंचाची संपूर्ण सजावट नितीन देसाई यांच्या देखरेखीखालीच झाली होती.

नितीन देसाई Nitin Desai यांचा प्रवास –

1993 साली आलेल्या विधु विनोद चोप्रा यांच्या ‘1942 अ लव स्टोरी’ या चित्रपटाच्या सेटमुळे नितीन देसाई यांना खरी ओळख मिळाली. त्यानंतर ‘हम दिल दे चुके सनम’, ‘लगान’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘खाकी’ अशा चित्रपटांसाठीही त्यांनी भव्य दिव्य सेट डिझाईन केले. त्यानी आत्तापर्यंत 178 हून सेट डिझाइन केले आहेत.

http://jamkhedtimes.com/breaking-news-famous-art-director-nitin-desais-suicide-there-was-big-stir-in-film-industry-nitin-desai-suicide-news/

नितीन देसाई (Nitin Desai) यांना लगान, हम दिल दे चुके सनम यांसारख्या चित्रपटांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2000 साली ‘हम दिल दे चुके सनम’ आणि 2003 मध्ये ‘देवदास’ या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शकाच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.