Dhule Accident : “भरधाव कंटनेर घुसला हाॅटेलमध्ये, भीषण अपघातात 12 जणांचा चिरडून मृत्यू, मुंबई -आग्रा महामार्गावर भीषण अपघात, मृतांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा समावेश” !

धुळे, 04 जूलै 2023 : समृध्दी महामार्गावर बस अपघाताची घटना ताजी असतानाच मुंबई- आग्रा (Mumbai-Agra highway accident) महामार्गावर आज भीषण अपघाताची घटना घडली.भरधाव कंटेनरने 12 जणांना चिरडण्याची धक्कादायक घटना धुळे (Dhule Accident) जिल्ह्यातील पळासनेर (Palasner Shirpur accident) गावाजवळ घडली. या घटनेत 12 जणांचा जागेवर मृत्यू झाला आहे तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. (Dhule Accident latest news)

Dhule Accident, Rushing container rammed into hotel, 12 people died in  terrible accident, terrible accident on Mumbai-Agra highway, Palasner Shirpur accident, school students are among dead.

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्यप्रदेशच्या सीमेवर येते. याच गावाजवळ आज, मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरचे ब्रेक निकामी होऊन तो थेट रस्त्याच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये शिरला. त्या आधी या कंटनेरने अनेक वाहनांना चिरडले.

http://jamkhedtimes.com/speeding-up-renewable-energy-projects-in-maharashtra-maharashtras-green-hydrogen-policy-announced-8-thousand-500-crore-approved04-july-2023-cabinet-decision/

या अपघातात आधी 5 जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता. तर 20 पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत होती. या अपघातात आता मृतांची संख्या वाढली असून आता मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे.

http://jamkhedtimes.com/dcm-ajit-pawar-latest-news-cabinet-has-been-expanded-what-accounts-will-the-new-ministers-get-ajit-pawars-finance-home-or-other-see-possible-list/

या भीषण अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. कंटनेर हॉटेलमध्ये शिरल्याने अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी हॉटेलच्या बाहेर इतरही अनेक वाहानं उभी होती. कंटेनर हॉटेलमध्ये शिरताना त्या वाहानांनाही धडकला. या अपघातातील जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

http://jamkhedtimes.com/cabinet-decisions-eight-important-decisions-were-taken-by-maharashtra-government-today-cabinet-decisions/

आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 14 चाकी कंटेनरचा ब्रेक अचानक फेल झाल्याने या कंटेनरने सुरवातीला समोर चालणाऱ्या दोन वाहनांना उडवलं. रस्त्याच्या कडेला थांबलेले प्रवासी, मजूर, शाळकरी विद्यार्थ्यांना देखील चिरडलं आहे. कंटेनरखाली चिरडून मृत पावलेल्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

http://jamkhedtimes.com/raju-shetti-latest-news-there-is-no-thought-of-new-marriage-right-now-raju-shetti-chhatrapati-shivaji-maharaj-shetkari-jagruti-abhiyan/

ही संपूर्ण अपघाताची (Dhule Accident) घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV मध्ये कैद झाली आहे. हे CCTV पाहिल्यानंतर तुम्हाला या अपघाताची भीषणता लक्षात येईल. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली. पोलिसांनीदेखील तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्याला सुरुवात केली.