मोठी बातमी : ‘ईद-ए-मिलाद’ निमित्त शासकीय सुट्टी जाहीर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय !

मुंबई, दि. २७ : अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी (दि. २८ सप्टेंबर) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस ‘ईद-ए-मिलाद’ निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

Chief Minister Eknath Shinde's decision, maharashtra government announce holiday on occasion of Eid-e-Milad, Eid-e-Milad holiday latest news,

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे आणि गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता येणे पोलिसांना शक्य व्हावे म्हणून २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश होता. 

अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबर रोजी ‘ईद-ए-मिलाद’ निमित्त सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन उद्या गुरुवारी पार पडणार आहे. याच दिवस ईद-ए-मिलाद हा सण देखील आहे. पण ईद दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचं मुस्लीम समुदयानं जाहीर केलं आहे. त्यामुळं गुरुवार अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी आहेच पण आता शुक्रवारी ईदची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळं गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं याबाबत माहिती दिली आहे.