Biparjoy Cyclone latest update : मुंबईचा धोका तुर्तास टळला, धोकादायक बिपरजाॅय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने, कच्छ आणि सौराष्ट्रला ऑरेंज अलर्ट जारी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अरबी समुद्रात निर्माण झालेले Biparjoy Cyclone गुजरात किनारपट्टीच्या दिशेने रवाना झाले आहे.यामुळे मुंबईचा धोका तूर्तास काहीसा टळला आहे.परंतू या चक्रीवादळामुळे अरबी समुद्राला उधाण आल्याने निर्माण झालेल्या लाटांनी रौद्ररूप धारण केले आहे.पुढील तीन चार दिवस ही स्थिती कायम राहणार आहेत.चक्रीवादळ गुजरातकडे वळल्यामुळे कच्छ आणि सौराष्ट्र भागाला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर गुजरातला जाणाऱ्या 60 पेक्षा रेल्वे गाड्या सरकारने रद्द केल्या आहेत.

Biparjoy Cyclone latest update, Mumbai threat averted immediately but Biparjoy Cyclone towards Gujarat, Kutch Saurashtra issued orange alert

बिपारजॉय चक्रीवादळ (Cyclone Biparjoy Latest Update) 15 जूनच्या संध्याकाळी ताशी125-135 किलोमीटर वाऱ्यांच्या वेगासह धडकणार असल्याची माहिती आहे. मुंबई किनारपट्टी भागात बुधवारी देखील वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किलोमीटर दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होणार आहेत.

Biparjoy Cyclone latest update, Mumbai threat averted immediately but Biparjoy Cyclone towards Gujarat, Kutch Saurashtra issued orange alert

जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्टदेखील असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बिपारजॉयचं लॅंडफॉल 15 जून रोजी झाल्यानंतर गुजरात, राजस्थान आणि दिल्लीपर्यंत त्यापुढील दोन तीन दिवसात पावसाची शक्यता आहे.

Biparjoy Cyclone latest update, Mumbai threat averted immediately but Biparjoy Cyclone towards Gujarat, Kutch Saurashtra issued orange alert

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा मुंबईला असलेला संभाव्य धोका टळला आहे. हे चक्रीवादळ मुंबईला समांतर राहात गुजरातच्या दिशेनं पुढे सरकलं आहे. त्यामुळं गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला या चक्रीवादळाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानमधील कराचीदरम्यान जमिनीवर धडकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.