मोठी बातमी : 9 जिल्ह्यांसाठी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता; 4 हजार 365 कोटींचा खर्च अपेक्षित, शिंदे सरकारचा मोठा निर्णय !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Government Medical colleges in maharashtra : राज्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये नाहीत, त्यामुळे त्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यास अडचणी येत होत्या, यामुळे राज्य सरकारने नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये निर्माण करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

big decision, Approval of new government medical colleges for 9 districts of Maharashtra; Expected expenditure of 4 thousand 365 crores, government medical colleges in maharashtra,

राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरु करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यात नवीन 9 ठिकाणी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमता असणारे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. या नऊ महाविद्यालयांसाठी ४ हजार ३६५ कोटी ७२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

http://jamkhedtimes.com/big-news-big-decision-of-school-education-department-regarding-fifth-and-eighth-exams-education-commissioner-suraj-mandhare-ias/

अमरावती आणि वर्धा येथील महाविद्यालयासाठी जागा कालातंराने निश्चित करण्यात येईल. सध्या २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये असून, त्यांच्या प्रवेश क्षमता ३ हजार ७५० विद्यार्थी इतकी आहे. महाराष्ट्रात प्रति एक हजार लोकसंख्येमागे ०.७४ इतके डॉक्टरांचे प्रमाण आहे. तर देशपातळीवर हे प्रमाण ०.९० इतके आहे. नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यानंतर डाॅक्टरांच्या संख्येत वाढ होणार आहे. यामुळे याचा फायदा आरोग्य व्यवस्थेत होताना दिसणार आहे.

http://jamkhedtimes.com/big-news-match-schedule-announced-for-icc-mens-cricket-world-cup-2023-india-vs-pakistan-first-match-on-this-day-world-cup-2023-schedule-cwc-latest-update/

दरम्यान, पालघर, ठाणे (अंबरनाथ), जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचा सरकारने निर्णय घेतल्यामुळे या भागातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक वर्षांची मागणी सरकारच्या या निर्णयामुळे मार्गी लागली आहे.

http://jamkhedtimes.com/agriculture-news-one-phone-call-and-problem-of-farmers-is-gone-farmers-thanks-to-mla-ram-shinde-latest-marathi-news/