आष्टीचे सुनिल चव्हाण बनले राज्याचे नवे कृषी आयुक्त, राज्यातील सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। राज्यात सत्तापालट झाल्यानंतर सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु आहे. मंगळवारी राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या सरकारने बदल्या केल्या. यामध्ये आयएएस अधिकारी सुनील चव्हाण यांचा समावेश आहे. सुनिल चव्हाण यांची राज्याचे कृषी आयुक्त म्हणून पुण्यात बदली करण्यात आली आहे.

Ashti's Sunil Chavan became the state's new agriculture commissioner, transfers of seven IAS officers in the state, IAS sunil Chavan

राज्याचे नवे आयुक्त सुनिल चव्हाण हे बीड जिल्ह्याातील आष्टी तालुक्यातील रहिवासी आहेत. ते २००७ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.त्यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून एम.एस.स्सी आणि व्यवस्थापन या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. शेती आणि ग्रामीण भागातील प्रश्नांची उत्तम जाण असलेला अधिकारी राज्याचा कृषी आयुक्त बनल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

शेतकरी आत्महत्या आणि शेती संबंधीच्या इतर ज्वलंत प्रश्नांवर नवे कृषी आयुक्त सुनिल चव्हाण हे अगामी काळात कोणत्या नवीन उपाययोजना हाती घेतात याकडे बळीराजाचे लक्ष असणार आहे. चव्हाण हे दुष्काळग्रस्त आष्टी तालुक्यातून येतात. त्यामुळे ते नक्कीच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी नव्या योजना आखतील असा विश्वास व्यक्त होत आहे. सुनिल चव्हाण यांची प्रशासनातील कामगिरी चांगली आहे. त्यांच्याकडून राज्यातील बळीराजाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

दरम्यान राज्य सरकारने मंगळवारी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांची राज्य उत्पादन शुल्क विभागात आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप हे बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी डॉ. सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे.

भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून यांची परभणी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. सुनील चव्हाण यांची कृषी आयुक्त, पुणे येथे बदली करण्यात आली आहे. एस. एम. कुर्तकोटी यांची भंडारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नांदेडमधील देगलूर उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तुकाराम मुंडे यांची शिर्डी येथील साईबाबा देवस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली.

IAS Transfer

1. Dr V.N. Suryawanshi , IAS-2006, Additional Commissioner MMRDA , Mumbai has been posted as Commissioner, Excise, Mumbai.

2. Bhagyashree Banayat – NL:2012, Chief Executive Officer , Shri Saibaba Sansthan Trust ,SHIRDI has been posted as Member Secretary, Vidharbha Statutary Development Board, Nagpur

3. Shri Vinay Sadashiv Moon, IAS-2011, Chief Executive Officer, Z.P.Bhandara has been posted as Chief Executive Officer , Z.P , Parbhani

4. Shri. Sunil S Chavan , IAS-2007, has been posted as Commissioner, Agriculture, Pune

5. Shri S.M Kurtkoti, IAS – 2013, has been posted as Chief Executive Officer, Z.P Bhandara

6. Smt Saumya Sharma, IAS -2018, Assistant Collector Deglur Sub Division Nanded has been posted as Chief Executive Officer, Z.P, Nagpur

7.Mr.Tukaram Mundhe posted as a  Chief Executive Officer , Shri Saibaba Sansthan Trust ,SHIRDI