Sayli Solanke : जामखेडच्या उपविभागीय अधिकारी म्हणून सायली सोळंके यांची नियुक्ती !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सायली अशोक सोळंके (Deputy Collector Sayli Ashok Solanke ) यांची जामखेड तालुक्यातील महसुली प्रकरणांच्या कामकाजासाठी उपविभागीय अधिकारी म्हणून शासनाने पदस्थापना केली आहे. त्यानुसार सायली सोळंके ह्या जामखेड तालुका उपविभागीय अधिकारी म्हणून आज 21 जून 2023 रोजी जामखेड तहसील कार्यालयात रूजू झाल्या आहेत.

Appointment of Saili Solanke as sub-divisional officer of Jamkhed, Deputy Collector Sayli Ashok Solanke jamkhed news,

सायली सोळंके यांची 2020 साली MPSC तून उपजिल्हाधिकारी निवड झाली होती. निवडीनंतर त्यांचे प्रशिक्षण पुण्यातील यशदा संस्थेत पार पडले. प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे काम केले आहे. तेथून त्यांची प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी म्हणून जामखेडला पदस्थापना करण्यात आली आहे.

रस्ता प्रकरणे व सामाजिक न्याय विभागात त्यांनी मालेगाव येथे असताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अतिशय अभ्यासू अन संवेदनशील महिला अधिकारी म्हणून त्यांनी महसुल विभागात अल्पावधीत नावलौकिक मिळवला आहे.

सायली सोळंके (Jamkhed sub-divisional officer sayli solanke) यांची जामखेड तालुका उपविभागीय अधिकारी म्हणून शासनाने पदस्थापना केल्यामुळे जामखेड तालुक्यातील महसुल प्रकरणांवर दररोज सुनावणी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कर्जत प्रांत कार्यालयाची जामखेड तालुक्यातील सर्व कामे आता जामखेडलाच होणार असल्यामुळे शेतकरी वर्गात विशेष आनंद निर्माण झाला आहे.

दरम्यान, जामखेडच्या उपविभागीय अधिकारी म्हणून सायली अशोक सोळंके ह्या आज 21 जून 2023 जामखेडला रूजू झाल्या आहेत. जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे, नायब तहसीलदार भोसीकर सह आदी अधिकारी व महसुल कर्मचारी यांच्या उपस्थितीत त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.