शिवस्फूर्ती समुहाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी अमोल वडवकर यांच्या नावाची घोषणा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । शिवस्फूर्ती समुहाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी श्रीगोंदा तालुक्यातील अमोल वडवकर यांंची तर धाराशिव जिल्हाध्यक्षपदी परांडा तालुक्यातील राज झोरे यांच्या निवडीची घोषणा शिवस्फुर्ती समुहाचे संस्थापक तथा प्रसिध्द शिवव्याख्याते संदिप कदम यांनी केली.

announcement of the name of Amol Vadavkar as Ahmednagar District President of Shivsfurti Group

गडकिल्ले संवर्धन व्हावे, सर्व जाती धर्मातील महापुरुषांच्या व संतांच्या प्रेरणा स्थळांचे संवर्धन व जतन व्हावे , विद्यार्थ्यांंना करिअरच्या संधी  निर्माण करून देणे व विविध सामाजिक कार्य करणे असे विविध उपक्रम शिवस्फूर्ती समुहाच्या माध्यमातून वर्षभर चालु असतात. मागील काळात संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर, गडकिल्ले स्वच्छता मोहीम, शाळेय विदयार्थ्यांना करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, वाचनालयाची निर्मिती असे विविध कार्यक्रम करण्यात आले आहेत.

शिवस्फुर्ती समुहाने राज्यभरात आपला विस्तार हाती घेतला आहे. अहमदनगर जिल्‍ह्यात संस्थेने वेगाने काम हाती घेतले आहे. त्याच धर्तीवर शिवस्फुर्ती समुहाने अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील अमोल वडवकर यांची निवड जाहीर केली. शिवस्फुर्ती समुहाचे संस्थापक शिवव्याख्याते संदिप कदम यांच्या हस्ते वडवकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी शिवस्फूर्ती समुहाचे सचिव विवेकानंद मोरे, कार्याध्यक्ष अशोक पठाडे, व्याख्याते संतोष मोरे, आढळगाव येथील भरत सुर्यवंशी, दिपक काळे, विजय जाधव , कोळगावचे सामाजिक  कार्यकर्ते निलेश जगताप, संदिप शिंदे हे उपस्थित होेते.