बाबो..चक्क कोंबडीने दिले 210 ग्रॅम वजनाचे अंडे, महाराष्ट्रातील भल्यामोठ्या अंड्याची देशात चर्चा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । निसर्ग कधी काय कमाल करेल याचा भरवसा नसतो, निसर्गाच्या चमत्कारापुढे कोणाचेच काही चालत नाही. आपल्या आसपास अश्याच अजब गजब अनेक घटना घडत असतात, त्याची जोरदार चर्चा होत असते. अशीच एक अचाट घटना महाराष्ट्रातून समोर आली आहे. या घटनेत कोंबडीने भले मोठे अंडे दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भलेेमोठे अंडे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी वाढू लागली आहे.

ajab gajab news, the chicken laid a big egg weighing 210 grams in kolhapur, biggest chicken egg in Maharashtra is being talked about all over country,

कोंबडीने भलेमोठे अंडे देण्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातून समोर आली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील तळसंदे या गावातील दिलीप महादेव चव्हाण यांच्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली आहे.

हातकणंगले तालुक्यातील तळसंदे या गावातील दिलीप महादेव चव्हाण हे गेल्या 38 वर्षांपासून पोल्ट्री व्यवसायात आहेत. नुकतेच त्यांच्या पोल्ट्रीतील एका कोंबडीने तब्बल 210 ग्रॅम वजनाचे अंडे दिल्याची घटना घडली आहे. कोंबडीने एवढे मोठे अंडे दिल्याने चव्हाण हेही अवाक् झाले. या अंड्याच्या रॅकोर्डबुक मध्ये नोंद व्हावी अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

ajab gajab news, the chicken laid a big egg weighing 210 grams in kolhapur, biggest chicken egg in Maharashtra is being talked about all over country,

तळसंदे येथील दिलीप चव्हाण यांची तळसंदे – वारणानदी रस्त्याला चव्हाण मळा येथे कोंबड्यांची पोल्ट्री आहे.रविवार रात्री एका कोंबडीने एक मोठे अंडे दिल्याचे दिलीप चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या नजरेत इतके मोठे अंडे पहिल्यांदाच पाहायला मिळाले.

त्यांनी प्रथम मोजपट्टीच्या साह्याने या अंड्याचे मोजमाप घेतले. इतर अंड्यांशी त्याची तुलना केली. त्यानंतर त्यांनी इतर अंडीही मापून पाहिलीत. तथापि हे अंडे मोठे असल्याने त्यांनी त्याचे वजन केले.

लिम्का बुक ऑफ रेकोर्ड नुसार आजपर्यंत भारतात जास्तीत जास्त १६२ ग्रॅम तर जागतिक स्तरावर ५०० ग्रॅम चे अंडे आढळून आले आहे. पोल्ट्री व अंडी व्यवसायातील तज्ञांच्या मतानुसार भारतात १०० ते १५० ग्रॅम पर्यंत वजनाची अंडी आतापर्यंत बहुदा सर्वत्र आढळतात.

त्यांनी त्यांच्या पोल्ट्रीत आढळलेल्या अंड्याचे वजन केले तर ते रविवारी रात्री २०० ग्रॅम तर तेच अंडे सोमवारी दुपारी २१० ग्रॅम भरले. हवामानाच्या बदलामुळे दहा ग्रॅमचा फरक पडला असल्याचे मत दिलीप चव्हाण यांनी व्यक्त केले. हे देशातील कोंबडीचे सर्वात मोठे अंडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने दिले आहे.