ACB Maharashtra : विहीर मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून 5 हजार रूपयांची लाच घेणारा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत विहिर खोदुन मिळण्याचे प्रकरण मंजूर करून देण्याचे मोबदल्यात शेतकऱ्याकडून 500 हजार रूपयांची लाच घेणारा पंचायत समितीचा विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. ही घटना नंदुरबार पंचायत समितीतून काल 19 रोजी समोर आली.

Bhaiyasaheb Nikumbhe, Nandurbar Panchayat Samiti's extension officer was caught red-handed by ACB while accepting bribe of 5 thousand rupees from farmer for approval of well.

याबाबत सविस्तर असे की, नंदुरबार तालुक्यातील रनाळे खुर्द येथील शेतकऱ्यांला आपल्या शेतात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत विहिर खोदुन घ्यायची होती, त्याकरिता त्याने नंदुरबार पंचायत समिती कार्यालयात विहीर प्रस्ताव दाखल केला होता. सदरचा प्रस्ताव मंजुर करून देतो, त्यापोटी विस्तार अधिकारी भैय्यासाहेब दिगंबर निकुंभे, (वय ५३) याने एक महिन्यापुर्वी 10 हजार रूपये लाचेची मागणी केली होती व त्याच दिवशी तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रूपये ॲडव्हाॅन्स घेतले होते.त्यानंतर तक्रारदार शेतकऱ्याने ॲन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार कार्यालयाकडे तक्रार दिली होती.

त्यानुसार 12 जून रोजी पडताळणी दरम्यान लोकसेवक भैय्यासाहेब निकुंभे विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती, नंदुरबार यांनी पुन्हा उर्वरीत 5 हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे पंच व साथीदारांसमक्ष स्पष्ट झाले.

त्यानंतर आज 19 जून 2023  रोजी नमुद लोकसेवक भैय्यासाहेब निकुंभे, विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती, नंदुरबार यांला तक्रारदार यांच्याकडून 5 हजार रूपयांची  लाचेची रक्कम स्विकारताना एसीबीने ताब्यात घेतले. ही घटना नंदुरबार पंचायत समिती कार्यालयाचे गेटच्या बाहेरील उजव्या बाजूस असलेल्या गणेश टी स्टॉल येथे घडली.पंच साक्षीदार यांच्या समक्ष लाच स्विकारताना निकुंभे हा चतुर्भुज झाला. सदर बाबत नंदुरबार शहर पोलीस स्टेशन, जिल्हा नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालु आहे, अशी माहिती एससीबीने जारी केली आहे.

या कारवाईच्या पथकात सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, श्रीमती. शर्मिष्ठा घारगे वालावलकर, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सोो. श्री. माधव रेड्डी, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, ” नाशिक, पोलीस उपअधीक्षक श्री. नरेंद्र पवार (वाचक) ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक, पोलीस उपअधीक्षक श्री. राकेश आनंदराव चौधरी, ला.प्र.वि., नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. समाधान एम. वाघ, श्रीमती. माधवी एस. वाम, पोहवा / विलास पाटील, पोहवा / विजय ठाकरे, पोना/ अमोल मराठे, पोना / संदीप नावाडेकर, पोना / देवराम गावीत, मपोना / ज्योती पाटील, पोना/मनोज अहिरे व चापोना/ जितेन्द्र महाले अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार यांचा समावेश होता.