महाराष्ट्रात शुक्रवारी आढळले 40 हजार नवे कोरोनाबाधित, 40,000 new corona Patient found in Maharashtra on Friday

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 7 जानेवारी ।  राज्यात मागील आठ दिवसांपासून कोरोनाचा मोठा उद्रेक झाला आहे.शुक्रवारी तर कोरोनाचा मोठा विस्फोट झाला. तब्बल 40 हजार 925 नवे रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राज्यातील सक्रीय रूग्णांचा आकडा आता दीड लाखाच्या जवळ पोहचला आहे. (40,000 New Corona Patient Found In Maharashtra On Friday)

महाराष्ट्रात दैनंदिन कोरोना रूग्ण संख्येत मोठी सुरू आहे. 31 डिसेंबर पासून कोरोना दुपटीने वाढू लागला आहे. राज्यात शुक्रवारी कोरोनाचा अक्षरशः महाउद्रेक झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात एकुण 40 हजार 925 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256  कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 20 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 1 लाख 41 हजार 492 इतकी झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे राज्यात शुक्रवारी एकही ओमिक्रॉन व्हेरिएंटचा रूग्ण आढळून आला नाही. राज्यात 876 ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आलेत त्यातील 435 रूग्णांचे RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. राज्यात सक्रीय ओमिक्रॉन बाधितांची संख्या 441 इतकी आहे. देशात सर्वाधिक ओमिक्रॉन रूग्ण महाराष्ट्रात आहेत.

राज्यात शुक्रवार अखेर 07 लाख 42 हजार 684 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 1463 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.8 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.7 टक्के आहे अशी माहिती राज्य आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

आठ दिवसांपासून कोरोनाचा दुप्पट वेग

राज्यात 31 डिसेंबरपासून कोरोनाने मोठा वेग पकडला आहे. रोज दुपटीहून अधिक रूग्ण आढळून येत आहेत. राज्यात सर्वाधिक सक्रीय रूग्ण मुंबई परिसरात आहेत. त्याखालोखाल ठाणे, पुणे, नागपूर, पालघर, रायगड, नाशिक मध्ये रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

राज्यातील मागील आठ दिवसातील आकडेवारी

31 डिसेंबर 20218067 रूग्ण
1 जानेवारी 2022 9,170 रूग्ण
2 जानेवारी 2022
11, 877 रूग्ण
3 जानेवारी 2022
12, 160 रूग्ण
4 जानेवारी 202218, 466 रूग्ण
5 जानेवारी 202226, 538 रूग्ण
6 जानवारी 202236,265 रूग्ण
7 जानवारी 202240 हजार 925