15 August 2022 | आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतून जामखेडमध्ये फडकणार 100 फुटी तिरंगा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर तिरंगामय वातावरण तयार झाले आहे. हरघर तिरंगा मोहिमेला देशातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आहे. 15 ऑगस्ट 2022 रोजी देशात नवा उत्साह संचारताना दिसणार आहे. जामखेड तालुक्यातही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मोठा उत्साह दिसून येत आहे.

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून उद्या संविधान चौकात 100 फुटी तिरंगा ध्वज फडकवला जाणार. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली.संविधान चौकातील नवीन नगरपरिषद इमारतीच्या प्रांगणात हा भव्य दिव्य सोहळा सकाळी 10 वाजता पार पडणार आहे. जामखेडच्या वैभवात भर घालणाऱ्या या सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन आमदार रोहित पवार यांनी केले आहे.