अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने गोदड महाराज मंदिरात लघुरुद्र अभिषेक

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : आ रोहित पवार व अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे यांच्या आरोग्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ अहमदनगर दक्षिण यांच्या वतीने कर्जतचे ग्रामदैवत संतश्रेष्ठ सदगुरू श्री गोदड महाराज यांच्या समाधीस लघुरूद्ध अभिषेक करून महाआरती करण्यात आली.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आ रोहित पवार व अहमदनगर दक्षिणचे खासदार डॉ सुजय विखे या दोन्ही नेत्यांना कोरोनाची लागण झाली. या दोन्ही लोक प्रतिनिधीना उत्तम आरोग्य लाभावे व कोरोना आजारातून दोघे ही लवकर बरे होऊन जनतेच्या सेवेत रुजु होण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ, अहमदनगर दक्षिण व अखिल भारतीय मराठा महासंघ, कर्जत-जामखेड यांच्या वतीने कर्जतचे ग्रामदैवत संतश्रेष्ठ सदगुरू श्री गोदड महाराज यांच्या समाधीस लघुरूद्ध अभिषेक व महाआरतीचे आयोजन शनिवार दि ८ रोजी करण्यात आले.

अ भा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बिभिषण खोसे पाटील, शेतकरी जिल्हाध्यक्ष गंगाधर बोरुडे, कर्जत तालुकाध्यक्ष सतिष पठाडे, जामखेड तालुकाध्यक्ष दत्ताजी शिंदे, शहराध्यक्ष प्रफुल्ल काळे, भाऊसाहेब तोरडमल, आशिष बोरा, बाळासाहेब गोसावी, सचिन पवार, शिवराजे खोसे पाटील यांनी अभिषेक करत श्री गोदड महाराजांच्या समाधीस तूप, खोबरे तेल, पिठी साखर, मध, उटणे व इतर साहित्याने अभिषेक करत लघुरुद्रास सुरुवात केली.

Laghurudra Abhishek at Godad Maharaj Temple on behalf of akhil bhartiy maratha mahasangh

या लघुरुद्रात प्रवीण घुले, अंबादास पिसाळ, दादा सोनमाळी, सुनील शेलार, विशाल म्हेत्रे, बाळासाहेब साळुंके, गणेश तोरडमल, सौरभ पाटील, मल्हारी खिळे यांनी रुद्र आवर्तने दिली.यावेळी मेघादादा पाटील, सचिन घुले, श्रीहर्ष शेवाळे, रमेश तोरडमल, रवी पाटील, सौ. मोहिनी घुले, स्वाती पाटील, संगीता खोसे, सायली खोसे, आदिती घुले, निखिल पाटील, अमित तोरडमल, निलेश ढेपे, निलेश शिंदे, श्रीनाथ अणपट, सोनूभाऊ मुरकुटे आदी सहभागी होत आरती करून दोन्ही लोक प्रतिनिधीच्या आरोग्याची मनोकामना व्यक्त केली. शेवटी संत श्री गोदड महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ काकडे यांनी सर्वाना प्रसादाचे वाटप केले.