कर्जत-जामखेड मतदारसंघात पत्रकार असुरक्षित, ‘कर्जत लाईव्ह’ बंद करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करा – कर्जतमधील पत्रकारांची पोलिसांकडे मागणी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कर्जत-जामखेड मतदारसंघात पत्रकार असुरक्षित असल्याची एक बाब समोर आली आहे. कर्जत तालुक्याच्या पत्रकारितेत कार्यरत असलेले कर्जत लाईव्ह हे प्रसारमाध्यम बंद करण्याची धमकी एका समाजकंटकाने सोशल मीडियातून दिली आहे. या घटनेचे पडसाद आज कर्जतमध्ये उमटले. कर्जत तालुक्यातील पत्रकारांकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.  कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निवेदन देऊन व्हाट्सॲप ग्रुपवर पोस्ट करणाऱ्या प्रसादकुमार खेडकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे.

Journalists unsafe in Karjat-Jamkhed Constituency, take action against person threatening to shut down 'Karjat Live' - Journalists in Karjat demand police,

शनिवारी रात्री प्रसादकुमार खेडकर याने ‘नितीनभाऊ धांडे मित्र मंडळ’ या व्हाट्सॲप ग्रुपवर ‘कर्जत लाईव्ह हे प्रसारमाध्यम बंद करण्याची धमकी दिली. त्याचे तीव्र पडसाद पत्रकारांमध्ये उमटले. ही धमकी म्हणजे प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. लोकशाहीमध्ये कोणत्या विषयावर बातम्या प्रसिद्ध करायच्या हा पत्रकारांच्या स्वातंत्र्याचा भाग आहे. या धमकीचा निषेध करत असल्याचे खेडकर याच्यावर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी निवेदनातून केली आहे.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश जेवरे, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, सुभाष माळवे, निलेश दिवटे, अफरोज पठाण, महादेव सायकर, भाऊसाहेब तोरडमल, योगेश गांगर्डे, किशोर कांबळे, सोमनाथ गोडसे, संतोष रणदिवे, किरण जगताप, अस्लम पठाण, विनायक ढवळे सह आदी पत्रकार निवेदन देताना उपस्थित होते.