IAS Kannan Gopinathan | प्रजेला नागरिक बनवणे हे माझे लक्ष्य : IAS कन्नन गोपीनाथन
जामखेड, दि. १६ सप्टेंबर | IAS kannan gopinathan speech in Jamkhed | नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता अधिकाऱ्यांना आणि सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. प्रश्न विचारणे हा जनतेचा संवैधानिक अधिकार आहे. आपण आपल्याच सरकारला प्रश्न विचारणार नाही तर मग कुणाला विचारणार ? असा सवाल करत सध्या देशात मुळ प्रश्नांवर चर्चा होणे आवश्यक आहे. मजबूत देश उभारणीसाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे. पण दुर्दैवाने वेगळ्याच मुद्द्यांवर देशात चर्चा होते. हे रोखणे आवश्यक आहे असे मत आएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन (IAS kannan gopinathan) यांनी जामखेडमध्ये आयोजित व्याख्यानात मांडले.
चर्चेतल्या बातम्या
युवक क्रांती दल (Yuvak kranti Dal) या संघटनेच्या वतीने १६ रोजी एका व्याख्यानाचे जामखेडमध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन (IAS Kannan Gopinathan) जामखेडमध्ये आले होते. ‘आजची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती’ या विषयावर कन्नन गोपीनाथन यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी युक्रांदचे सहकार्यवाह अप्पा अनारसे, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रवीण सप्तर्षी, युक्रांदचे पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, अभिजीत मंगल, अॅड अरूण जाधव, लक्ष्मण घोलप, संयोजक म्हणून विशाल राऊत, अनिल घोगरदरे, विशाल नेमाने, विशाल रेडे, विजय घोलप हे उपस्थित होते.
पुढे बोलताना आयएएस कन्नन गोपीनाथन (IAS Kannan Gopinathan) म्हणाले की, देशात एवढी महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेल तेलाचे भाव खूप वाढले आहेत. लोकांनी धर्मांधता आणि धार्मिक धृवीकरणाच्या जाळ्यात न अडकता रोजगार आणि महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारायला हवेत.
कलम 370 च्या मुद्द्यावरून केंद्र सरकारशी मतभेद झाल्यानंतर आएएस कन्नन गोपीनाथन यांनी जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देऊन देशात खळबळ उडवून दिली होती. तेव्हापासून ते देशात चर्चेत आहेत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन जनतेशी विशेषता: युवकांशी संवाद साधण्याची मोहीम हाती घेतली आहे.
देश समजुन घेणं हे माझे लक्ष्य
देश समजुन घेणे हे माझे लक्ष आहे. जनतेचे प्रश्न समजुन घेण्याबरोबरच माझे प्रश्न जनतेसमोर मांडणे व संवादाची प्रक्रिया घडवणून यावर यावर मी सध्या काम करत आहे. मी निवडणूक लढवणार का ? मी संघटना सुरू करणार का? मी एनजीओ सुरू करणार का ? आण्णा अंदोलनासारखी चळवळ हाती घेणार का ? असं काही माझं ठरलेलं नाही. देश समजुन घेतोय पुढे काय होईल माहित नाही असेही कन्नन गोपीनाथन (IAS Kannan Gopinathan) यावेळी बोलताना म्हणाले.
