Today Corona Update jamkhed news | जामखेड तालुक्यात आज कुठल्या गावात किती रूग्ण ? वाचा आकडेवारी

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  जामखेड तालुक्यातील ठाण मांडून बसलेला कोरोना शांत व्हायचे नाव घेईना. मंगळवारी कोरोनाने मोठा दणका होता. मात्र बूधवारी तो काहीसा थंडावला आहे. परंतु कोरोनाचा वाढता फैलाव मोठ्या धोक्याची घंटा वाजवत आहे. (Today Corona Update jamkhed news )

जनता बेफिकरपणे दैनंदिन व्यवहारात दंग आहे. विशेषता: प्रशासनही आता कठोर उपाययोजनांचा बडगा उगारण्याच्या मूडमध्ये नाही. कोरोनाची वाढती रूग्णसंख्या रोखणे आवश्यक आहे. पण ती कोण रोखणार ? हा खरा सवाल आजही कायम आहे. (Today Corona Update jamkhed news )

बुधवारी १५ रोजी जामखेड तालुका आरोग्य विभागाने ६७२ नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या आहेत. त्यामध्ये  जामखेड ०३, बावी ०२, वाघा ०१, वाकी ०१, भवरवाडी ०२, सौताडा ०१ असे १० रूग्ण आढळून आले आहेत.

तर RTPCR तपासणी अहवालात जामखेड ०३,  धोतरी ०१, खर्डा ०१, सोनेगाव ०१, वाघा ०१, शिऊर ०२ असे ०९ रूग्ण आढळून आले आहेत.

बुधवारी दिवसभरात एकुण 19 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर आरोग्य विभागाने दिवसभरात एकुण ३५१ नागरिकांचे स्वॅबनमुने कोरोना तपासणीसाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात पाठवले आहेत. (Today Corona Update jamkhed news)